Next
मुंबईत हरिदास संगीत संमेलन
Press Release
Monday, June 05, 2017 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोमुंबई : सूरसिंगार संसद आणि मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे ५९व्या स्वामी हरिदास संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंडित ब्रिजनारायण, उमा डोग्रा आणि आयएएस दिलीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

आठ ते १६ जूनपर्यंत दररोज सायंकाळी भारतातील विविध राज्यांतील संगीत व नृत्याविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना या निमित्ताने मिळणार आहे. आठ ते दहा जून या कालावधीत भरतनाट्यम्, कथ्थक, मोहिनीअट्टम, ओडिसी, कुचिपुडी यांसारख्या शास्त्रीय नृत्यांची मेजवानी उपस्थितांना मिळेल. ११ ते १३ जून या कालावधीत दररोज गायन आणि व्हायोलिन, सारंगी, सरोद, सतार या वाद्यांच्या वादनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील. 

प्रातिनिधिक फोटोया संमेलनामध्ये १४ ते १६ तारखेदरम्यान आचार्य बृहस्पती संगीत संमेलन पार पडेल. १४ तारखेला अतुल व विपुल यांचे भजन संमेलन, १५ व १६ तारखेला सूरसिंगार संसद आणि जलोटा वेल्फेअर फाउंडेशनतर्फे पंडित पुरुषोत्तमदास जलोटा गझल संमेलन व पंडित पुरुषोत्तमदास जलोटा भजन संमेलन रंगणार आहे. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आनंद सिंग करणार आहेत. ‘हा कार्यक्रम मोफत असून, कलाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा,’ असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाविषयी :
दिवस आणि वेळ :
आठ ते १३ जून : सायंकाळी सहा वाजता.
१४ ते १६ जून : सायंकाळी साडेसहा वाजता.
स्थळ : विद्यापीठ विद्यार्थी भवन, चौथा मजला, ‘बी’ रोड, चर्चगेट, मुंबई.

अधिक माहितीसाठी संपर्क :
एम. के. पटेल : ९३२२० ०२६७७
जनक दलाल : ९८७०० ९०३७१
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Urmila sharma About
Good wishes from me urmila sharma Allahabad
0
0

Select Language
Share Link
 
Search