Next
पुण्यातील मुलींना ख्रिस गेलने दिले क्रिकेटचे धडे
प्रेस रिलीज
Wednesday, May 23, 2018 | 03:22 PM
15 0 0
Share this article:पुणे : घणाघाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने येथील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला दुसऱ्यांदा भेट दिली. नुकत्याच झालेल्या महिलांच्या पहिल्या आयपीएल टी-२० प्रदर्शनी सामन्याचे औचित्य साधत ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांच्या पुढाकाराने पुण्यातील क्रिकेट शिकणाऱ्या मुलींना थेट ख्रिस गेलशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

संग्रहालयात गेलने या मुलींना बॅट पकडण्याच्या तंत्राविषयी टिप्स दिल्या; तसेच त्यांच्या मनातील क्रिकेटविषयक काही शंकाचे निरसन देखील केले. या वेळी संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे व क्रिकेट शिकणारी काही मुले देखील उपस्थित होती. संग्रहालयाचे काम पाहून गेल प्रभावित झाला आणि त्याने त्याच्या यंदाच्या आयपीएल मोसमात शतक झळकावलेली बॅट व किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची जर्सी संग्रहालयासाठी पाटे यांच्याकडे सुपूर्द केली. याआधीही गेलने त्याचा सहभाग असलेल्या टी-२० विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीज संघाची जर्सी संग्रहालयाला दिली होती.

‘आयपीएल ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग असली, तरी भारतीय खेळाडूंनी इतर देशांत होणाऱ्या लीगमध्ये सहभागी व्हायला हवे,’ असे मत गेलने व्यक्त केले. ‘यंदाच्या ‘आयपीएल’ मोसमात कित्येक सामन्यांचा निकाल हा सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर लागला अशा प्रकारची चुरस असताना कोण जिंकेल हा अंदाज देणे अत्यंत अशक्य आहे,’ असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. फुटबॉलपटू रोनाल्डोचा चाहता असलेल्या ख्रिस गेलला त्याच्याविषयी विचारले असता ‘रोनाल्डो येत्या फुटबॉल विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करून आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देईल,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search