Next
श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, August 08, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this story

‘लेट हर क्राय’ चित्रपटातील एक क्षणपुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) १० ते १३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत लॉ कोलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीआयसी’ने आयोजित केलेला हा सलग ११वा चित्रपट महोत्सव आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. आपल्या शेजारच्या देशांमधील चित्रपटांना भारतात स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘पीआयसी’तर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे विशेष सहकार्य मिळते. यावर्षीच्या श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन श्रीलंकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, पटकथाकार धर्मसिरी बंदरनायके यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता होईल.

हंस विलकयाआधी या महोत्सवात बांग्लादेश, अफगाणिस्तान, कझाकीस्थान, इराण, नेपाळ आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात आले होते. यावर्षी भारताशी सांस्कृतिक साधर्म्य असलेल्या श्रीलंकेतील चित्रपट पुणेकर रसिकांना पाहायची संधी मिळणार आहे. या महोत्सवाची संकल्पना ही मिश्र असून, यामध्ये उघडपणे असलेल्या आणि लपविलेल्या आकांक्षा यांमधील परिणाम दाखविणारे ‘हंसा विलक आणि लेट हर क्राय’ हे चित्रपट, कित्येक वर्षे लोकांच्या हृदयात आणि नागरिकांच्या मनात अंतर्भूत असलेल्या २५ वर्षांच्या अंतर्गत युद्धाचे अनपेक्षित परिणाम विषद करणारे ‘विथ यू, विदाउट यू’ आणि ‘दी फोरसेकन लॅंड’ हे चित्रपट, अंधश्रद्धा आणि अपरिचित प्रेम यांवर भाष्य करणारा ‘वैष्णवी’, अनपेक्षितपणे समोर येणाऱ्या भूतकाळातील गोष्टी सांगणारा ‘फ्लॉवर्स ऑफ द स्काय’ यांबरोबरच ‘अलोन इन दी व्हॅली’, ‘संकरा’, ‘दी हंट’ आदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

दी हंटमहोत्सवात दाखविण्यात येणारे अनेक चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेले असून, यातील अनेकांनी भारतीय दिग्दर्शकांबरोबरही कामे केलेली आहेत. श्रीलंकेच्या प्रसन्ना विथनागे यांच्या ‘विथ यू, विदाउट यू’ आणि ‘फ्लॉवर्स ऑफ द स्काय’ या दोन चित्रपटांचे संकलन हे भारतातील श्रीकर प्रसाद यांनी केले आहे.

याबरोबरच सत्यजित रे यांच्या ‘प्रतिद्वंद्वी’मध्ये काम केलेल्या बंगालच्या धृतीमन चॅटर्जी यांनी अशोका हंदागामा यांच्या ‘लेट हर क्राय’ या चित्रपटात भूमिका वठविली असून, हा चित्रपट या महोत्सवादरम्यान पुणेकरांना पाहता येणार आहे. याबरोबरच विमुक्थी जयसुंदरा हे नुकतेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय ज्युरींच्या समितीत सामील झाले होते. या महोत्सवासाठी श्रीलंकेच्या एशियन फिल्म सेंटरचे संचालक, लेखक, संपादक, चित्रपट समीक्षक अॅश्ली रत्नविभुषणा यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

चित्रपट महोत्सवाविषयी :
उद्घाटन :
शुक्रवार, १० ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
कालावधी : १० ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०१८
स्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कोलेज रस्ता, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link