Next
भारतीयांमध्ये वाढतेय क्रेडिट कार्ड वापराचे प्रमाण
प्रेस रिलीज
Tuesday, October 03 | 06:05 PM
15 0 0
Share this story

पुणे :  भारतातील शहरी ग्राहकांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे.  ट्रान्सयुनियन सीबीलने केलेल्या एका ऑनलाइन पाहणीचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यानुसार शहरी ग्राहकांपैकी दोन तृतीयांश (६६ टक्के) जणांकडे किमान एक क्रेडिट कार्ड आहे, तर १९ टक्के लोकांनी ते क्रेडिट कार्डासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले. या १९ टक्क्यांपैकी ५५ टक्के लोकांकडे सध्या क्रेडिट कार्ड नाही.

ट्रान्सयुनियन सीबीलने अग्रगण्य जागतिक संशोधन पुरवठादार YouGovPlcच्या सहयोगाने १३ ते १८ जुलैदरम्यान १,०८८ शहरी प्रौढ नागरिकांची ऑनलाइन पाहणी केली. सर्वेक्षणासाठी घेण्यात आलेले लोक एकूण भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत आर्थिक मिळकत आणि शिक्षण या दोन्ही बाबतीत उच्च स्तरावरील होते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापराची शक्यता त्यांच्याबाबत अधिक होती.

तरीही, या पाहणीच्या निष्कर्षानुसार गेल्या १२ महिन्यांत शहरी भारतीय ग्राहकांमध्ये क्रेडिट कार्डाचा वापर वाढला आहे. क्रेडिट कार्डधारकांपैकी निम्म्याहून अधिक लोकांनी (५७ टक्के) गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी क्रेडिट कार्ड अधिक वापरल्याचे नमूद केले आहे.‘दैनंदिन खरेदीसाठी ग्राहक क्रेडिट कार्ड वापरत असल्याचे आमच्या पाहणीत दिसून आले आहे’, असे ट्रान्सयुनियन सीबीलचे उपाध्यक्ष व थेट ग्राहकापर्यंत उद्योग विभागाचे प्रमुख हृषिकेश मेहता म्हणाले. ‘भारतातील क्रेडिट कार्डाच्या वापरात झालेली वाढ बघून आम्ही चकीत झालो आहोत. क्रेडिट कार्डाचा जबाबदारीने वापर, माहितीचा व्यासंग आणि पतबांधणीबद्दल ग्राहकांना माहिती देण्यात आम्हाला आनंद आहे’.

क्रेडिट कार्ड वापराची अनेकविध कारणे पाहणीदरम्यान लोकांनी नोंदवली. गेल्या १२ महिन्यांत नेमके कशासाठी क्रेडिट कार्ड वापरले असे विचारले असता, ५९ टक्के लोकांनी बिले भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरल्याचे सांगितले. ५३ टक्के लोकांनी मोठ्या खरेदीसाठी तर ४५ टक्के लोकांनी सवलती किंवा अन्य बक्षिसे मिळवण्यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर केल्याचे स्पष्ट केले.१८ ते २४ या वयोगटातील ग्राहकांमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमुख कारण त्यांना रोख रक्कम बाळगणे आवडत नाही हे होते. जवळपास एक चतुर्थांश लोकांनी (२४ टक्के) या कारणाची नोंद केली. रोख रक्कम बाळगणे आवडत नसल्याचे कारण ४५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील लोकांपैकी १४ टक्के लोकांनीच दिले. ४५ वर्षांवरील लोकांमध्ये क्रेडिट कार्ड वापराचे प्रमुख कारण (३३ टक्के लोकांनी दिलेले)म्हणजे क्रेडिट कार्डामुळे त्यांना केलेल्या आता केलेल्या खरेदीची किंमत नंतर चुकती करण्याची मुभा मिळते. या कारणामुळे क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण १८ ते २४ वयोगटात केवळ १३ टक्के आहे.

गेल्या१२ महिन्यात क्रेडिट कार्डाद्वारे केलेल्या व्यवहारांत ठरवलेल्या बजेटपेक्षा २० टक्के अधिक खर्च झाल्याचे २९ टक्के लोकांनी सांगितले. क्रेडिट कार्डाचे बिल भरण्यासाठी ठरवल्यापेक्षा अधिक काळ लागल्याची कबुलीही २० टक्के लोकांनी दिली.‘क्रेडिट कार्डामुळे ती वापरणाऱ्याच्या पतीवर थेट प्रभाव पडतो. कारण ग्राहक उधारीचे निर्णय कसे घेतात हे त्यांच्या क्रेडिट कार्ड वापरावरून त्वरित कळून येते. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनी त्यांच्या सीबील स्कोअरबद्दल दक्ष असणे गरजेचे आहे. हे सगळे कसे काम करते आणि क्रेडिट कार्डाच्या वापरामुळे दर महिन्याला त्यांच्या स्कोअरवर कसा परिणाम होतो, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे’, असे मेहता यांनी नमूद केले.

क्रेडिट कार्डाचा वापर करताना हा स्कोअर व आर्थिक प्रतिमा चांगली ठेवण्यात मदत करण्यासाठी मेहता यांनी खालील सूचना केल्या आहेत:
•     दर महिन्याला वेळेवर आणि संपूर्ण बिल भरा : पत निकोप राखण्यामध्ये प्रमुख योगदान असते ते क्रेडिट कार्डाची बिले वेळेवर आणि पूर्ण भरण्याचे.पाहणीदरम्यान आढळले की क्रेडिट कार्ड बिलाची किमान रक्कम भरली तरी सीबील स्कोअर चांगला राखण्यासाठी पुरेसे आहे अशी गैरसमजूत चक्क ५६ टक्के ग्राहकांची आहे. अर्थात केवळ किमान रक्कम भरत राहण्याने त्यांच्या पतबांधणीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण, कार्डाचा बॅलन्स वाढत राहिला तर कालांतराने परतफेडीचा बोजा खूप वाढू शकतो.

•     खाते बंद करताना काळजी घ्या : सर्वेक्षणातील सुमारे निम्म्या (४८ टक्के) ग्राहकांची अशी गैरसमजूत होती की, न वापरली जाणारी क्रेडिट कार्ड खाती बंद केल्यास त्यांच्या सीबील स्कोअरवर सकारात्मक परिणाम होईल. प्रत्यक्षात, जुनी खाती बंद करण्याचा सीबील स्कोअरवर होणारा परिणाम एवढा साधा नाही. क्रेडिट कार्ड खाते बंद करण्याचा परिणाम त्या कार्डाद्वारे पुरवल्या जाणा-या उपलब्ध पतीच्या टक्केवारीवर आणि त्या खात्याच्या पत इतिहासाच्या लांबीवर अवलंबून असतो. त्यामुळे दीर्घ पत इतिहास असलेले किंवा मोठ्या प्रमाणावर पत उपलब्ध असलेले क्रेडिट कार्ड खाते बंद केल्यास ग्राहकाच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

•     क्रेडिट कार्ड बिलावर बारीक लक्ष ठेवा: बिलावर काटेकोर लक्ष ठेवल्यास तुम्हाला स्टेटमेण्टमध्ये काही न कळणारे चार्जेस लावलेले असतील तर ते लक्षात येईल. हे चार्जेस कदाचित फसवणुकीचा भाग असतील. क्रेडिट कार्डाच्या बिलावर बारीक लक्ष ठेवल्यास अशा प्रकारची फसवणूक तुमच्या त्वरित लक्षात येईलच, शिवाय तुम्ही आवाक्याबाहेरचा खर्च तर करत नाही ना याकडेही तुमचे लक्ष राहील.

•     क्रेडिट रिपोर्ट्‌समधील चुकांवर लक्ष ठेवा : नव्याने क्रेडिट कार्ड वापरू लागलेल्यांनी क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासण्याची सवय लावून घ्यायला हवी. यामुळे कोणतीही अनियमित हालचाल किंवा फसवणुकीचे व्यवहार वेळीच लक्षात येतील. शिवाय स्कोअरवर परिणाम करणारे चांगले पतव्यवस्थापन शिकता येईल. ट्रान्सयुनियन सीबील दरवर्षी एक मोफत क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोअर देते. याहून अधिक अहवाल मिळवण्यासाठी ग्राहक ट्रान्सयुनियन सीबीलच्या cibil.com वेबसाइटला भेट देऊन सबस्क्राइब करू शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link