Next
‘दिव्याज फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, June 24, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘संगीत क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे; पण संधी मिळत नाही अशा मुलांना संधी मिळवून देण्याचे कार्य  दिव्याज फाउंडेशन करते. त्यामुळे मुलांना चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याज फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

फाउंडेशनच्या ‘मिट्टी के सितारे’ या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीचे बक्षीस वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, ग्रॅमी पुरस्कार विजेता जेरी ओंडा, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, संगीतकार अनु मलिक, अभिनेत्री मनीषा कोईराला, अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेते आणि गायक हिमेश रेशमिया यांसह राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘मिट्टी के सितारे’ या उपक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमधून ६०० विद्यार्थ्यांनी आपल्या कलांचे व्हिडिओ पाठवले होते. यानंतर ऑडिशन घेऊन १८ विद्यार्थी निवडण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना शंकर महादेवन अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या १८ विद्यार्थ्यांचे अंतिम फेरीत ए, बी आणि सी असे तीन गट करण्यात आले. अंतिम फेरीत ग्रुप ए पारितोषिक विजेता ठरला, तर  ग्रुप सीने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. सर्व सहभागी मुलांना पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आली.

दिव्याज फाउंडेशनतर्फे मुलांमधील कलागुणांचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांच्यातील कलागुणांना संधी प्राप्त करून दिली जाते. फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search