Next
‘बीएमडब्ल्यू ६’ सिरीज ‘ग्रॅन टूरिझ्मो डिझेल’मध्‍ये उपलब्‍ध
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 04:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : फर्स्‍ट-एव्‍हर ‘बीएमडब्ल्यू ६’ सीरिज ग्रॅन टूरिझ्मोला एका नवीन डिझेल इंजिन व्‍हेरिएंटसह सादर करण्‍यात आली. ‘बीएमडब्ल्यू ६’ सिरीज ग्रॅन टूरिझ्मो आता पेट्रोल आणि डिझेल दोन्‍ही पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे आणि यामध्‍ये अॅस्‍थेटिक आकर्षण, कूपे प्रमाणे भव्‍यता, लांब अंतराच्या प्रवासासाठी आरामदायी आणि डायनॅमिक परफॉर्मन्‍सचा अनोखा मेळ साधण्यात आला आहे.

लक्‍झरी लाइन आणि एम स्‍पोर्ट ही ‘बीएमडब्ल्यू ६’ ग्रॅन टूरिझ्मोची दोन डिझाइन स्‍कीम्‍स आहेत. या दोन्‍ही गाड्या  भारतभरातील सर्व ‘बीएमडब्ल्यू’ डिलरशीप्‍समध्‍ये उपलब्‍ध असणार आहेत. लक्‍झरी लाइनमध्‍ये मोहक रूपरेषा आहे आणि अलिशान वैशिष्‍ट्यांसह स्‍टाइलचाही समावेश आहे, तर एम स्‍पोर्टमध्ये कारशी संबंधित डायनॅमिक वैशिष्ट्यांचा उत्साह सामावला आहे. डिझेल व्‍हेरिएंटच्‍या सादरीकरणासह ‘बीएमडब्ल्यू ६’ सिरीज ग्रॅन टूरिझ्मोचे सध्‍याचे पेट्रोल व्‍हेरिएंटदेखील आता जुलै २०१८पासून एका नवीन डिझाइन ट्रिममध्‍ये उपलब्‍ध होईल. नवीन ‘बीएमडब्ल्यू ६३०आय’ ग्रॅन टूरिझ्मो लक्‍झरी लाइनच्‍या बाह्य सजावटीत क्रोम डिझाइन तत्‍व आणि अंतर्गत भागात फाइन-वूड ट्रिमचे रूप मिळेल.

‘बीएमडब्ल्यू’ ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पावाह म्‍हणाले, ‘बीएमडब्ल्यू ६ सिरीज ग्रॅन टूरिझ्मोच्‍या सादरीकरणासह आम्‍ही इंडियन लक्‍झरी कार मार्केटमध्‍ये एक नवीन सेगमेंट तयार केले आहे. ‘बीएमडब्ल्यू ६’ सिरीज ग्रॅन टूरिझ्मोने आपली शानदार उपस्थिती आणि आकर्षक कूपे स्‍टाइलमुळे गर्दीमध्‍ये आपले वेगळे स्‍थान बनवले आहे. ट्रेडमार्क ‘बीएमडब्ल्यू’ ड्रायव्हिंग प्‍लेझर आणि लांब अंतराच्‍या आरामासह या गाडीने चालक आणि प्रवासी दोघांसाठी सर्वोत्तम अनुभव निर्माण केला आहे. ‘बीएमडब्ल्यू ६’ सिरीज ग्रॅन टूरिझ्मोच्‍या यशाला आता पुढे नेण्‍यात येईल, जसे की आम्‍ही हिला एक नवीन डिझेल व्‍हेरिएंटमध्‍ये सादर करत आहोत. यामुळे आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी आणखी पर्याय उपलब्ध होतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link