Next
विष्णू लाम्बा, श्रीनिवास सुंचूवार यांना सुकृत पुरस्कार
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 02:11 PM
15 0 0
Share this story

पुणे : वंचित विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘सुकृत पुरस्कार’  यावर्षी विष्णू लाम्बा व श्रीनिवास सुंचूवार यांना जाहीर झाला आहे. शनिवारी, बारा मे रोजी, सायंकाळी पाच वाजता श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

‘या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते पराग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे असणार आहेत. हा पुरस्कार शुभदा सारस्वत प्रकाशन यांनी पुरस्कृत केला आहे. वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष व संचालक सुनीताताई जोगळेकर, कार्यवाह व संचालक मीनाताई कुर्लेकर व शरद गोगटे आदी मान्यवर या वेळी उपस्थित असतील. अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. 

ट्री मॅन म्हणून ओळख असणाऱ्या विष्णू लाम्बा यांनी वयाच्या तिशीपर्यंत लाखो झाडे लावली आहेत.  निसर्गप्रेमी विष्णू लाम्बा यांनी ‘कल्पतरू संस्थान’ स्थापन करून ऋग्वेद कालखंडानंतर पहिल्यांदाच पर्यावरणीय विवाह सुरु केला. नि:शुल्क पक्षी चिकित्सा शिबीर, वृक्षारोपण, नेत्रदान, रक्तदान, वस्त्रदान, सैनिकांचा सन्मान, पक्षी मित्र सन्मान, वृक्ष मित्र सन्मान यांसारखे उपक्रम घेऊन त्यांनी लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. 

श्रीनिवास सुंचूवार कैदी बांधवांचे मनपरिवर्तन करून त्यांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचे कार्य करत आहेत.  त्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील कारागृहांमध्ये जाऊन कैदी बांधवांसाठी निबंध स्पर्धा व कवी संमेलनाचे आयोजन केले,  त्यातील सर्वोत्कृष्ट निबंध प्रकाशित केले आहेत.  गडचिरोली येथे शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांना शालेय साहित्यांचे वाटप करून त्यांच्या वीर माता व पत्नींचा सन्मानदेखील त्यांनी केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link