Next
अजय देवगणचा ‘तानाजी’ येणार पुढच्या वर्षी
प्रेक्षकांना आणखी काही दिवस करावी लागणार प्रतीक्षा
BOI
Monday, March 25, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : अभिनेता अजय देवगण साकारत असलेला शिवाजी महाराजांचा करारी योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा जीवनपट आता पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट २७ डिसेंबर २०१९ला प्रदर्शित होणार होता. प्रदर्शनाच्या तारखेत बदल केल्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

अभिनेता अजय देवगणने याबाबत नुकतेच एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमधून त्याने आता १० जानेवारी २०२०ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. तेव्हा नवीन वर्षाची सुरुवात सर्वांनी या चित्रपटाने करावी, असे आवाहन अजयने केले आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्त्वाने आपले नाव इतिहासात अजरामर करणारा लढवय्या म्हणून तानाजी मालुसरे यांचे नाव घेतले जाते. या करारी योद्ध्याच्या शौर्याची गाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 

१५० कोटी बजेट असलेल्या, ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण तानाजी मालुसरेच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता सलमान खान शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय अभिनेत्री काजोल शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठीतील अभिनेता अजिंक्य देव हादेखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप त्याच्या भूमिकेबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

खुद्द अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा जगता येणार आहे. सिंहगड किल्ला, तो राखण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी दिलेले मोलाचे योगदान, त्यासाठी त्यांनी केलेली पराक्रमांची शर्थ, कुटुंबावर ठेवलेले तुळशीपत्र हे सगळे प्रसंग या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा जिवंत करण्यात येणार आहेत. तेव्हा या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search