Next
‘व्होडाफोन पग-अ-थॉन’ स्पर्धेत पुण्याचे दोन विजेते
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 04:19 PM
15 0 0
Share this story

 व्होडाफोन इंडिया’तर्फे घेण्यात आलेल्या ‘तीस  दिवस पग-अ-थॉन’ या स्पर्धेतील विजेते प्रतिककुमार दुबे, सूरज बाळेकुंद्री, लातूरचे सचिन व्यवहारे व औरंगाबादचे बळीराम शेळके आदी.                                                                                          
पुणे : ‘व्होडाफोन इंडिया’तर्फे घेण्यात आलेल्या ‘तीस  दिवस पग-अ-थॉन’ या स्पर्धेत पुण्याचे प्रतिककुमार दुबे, सूरज बाळेकुंद्री हे दोघेजण विजेते ठरले. लातूरचे सचिन व्यवहारे व औरंगाबादचे बळीराम शेळके यांनीही या स्पर्धेत बक्षीस मिळवले. या चारही  ग्राहकांना ‘आयफोन-८’ हा मोबाईल देऊन  गौरविण्यात आले.   
 
‘तीस दिवस पग-अ-थॉन’ ही गेमिंग स्पर्धा संपूर्ण देशात महिनाभर आयोजित करण्यात आली होती. ‘व्होडाफोन’च्या प्रीपेड तसेच, पोस्टपेड ग्राहकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी होती. ‘माय व्होडाफोन’ अॅपच्या माध्यमातून ग्राहकांनी मोबाईलवर सर्फिंग करायचे व विविध पेजेसवर, वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहिलेल्या ‘व्होडाफोन पग्ज’ना शोधायचे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते. सात किंवा त्यापेक्षा जास्त पग शोधून काढणाऱ्यांना दोन लाख रुपये किंमतीचे ‘सुपर अॅम्पल हॅम्पर’ देण्यात आले. ‘आयफोन-८’ आणि ‘सुपर अॅम्पल हॅम्पर’ या बक्षिसांव्यतिरिक्त शोधलेल्या प्रत्येक ‘पग’मागे वेगळे ‘सरप्राईज गिफ्ट’ देण्यात आले. 

स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करताना ‘व्होडाफोन इंडिया’च्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे प्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, ‘व्होडाफोन इंडिया’मध्ये आम्ही नेहमीच नावीन्यपूर्ण योजना आखून, ग्राहकांना गमतीचे व विविध अनुभव देत असतो. ‘तीस दिवस पग-अ-थॉन’ ही ‘माय व्होडाफोन’ अॅपवरील स्पर्धाही याच प्रकारचा आनंद ग्राहकांना देण्यासाठी आयोजित करण्यात आली. एका क्लिकवरून या अॅपमध्ये काय करता येते, याचा अनुभवही ग्राहकांना या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाला. आमच्या सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना ‘व्होडाफोन’सह अधिक काळ आनंदात राहता यावे, यासाठी शुभेच्छा देतो.’
 
‘व्होडाफोन’च्या ग्राहकांना सर्व सेवा मोबाईलवर अगदी एका क्लिकवर मिळाव्यात, यासाठी ‘माय व्होडाफोन’ हे अॅप विशेष प्रकारे बनविण्यात आले आहे. बिलाचे पेमेंट, रिचार्ज, आपल्या प्लॅनचे तपशील, नवीन उत्पादनांची उपलब्धता आदी सुविधा या अॅपमध्ये देण्यात आल्या आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link