Next
मारुती कांबळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
मिलिंद जाधव
Tuesday, December 11, 2018 | 05:42 PM
15 0 0
Share this storyशहापूर : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या महाराष्ट्र शासन आदिवासी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात झाला. यात प्रकल्पातर्फे चालवण्यात येणाऱ्या आश्रम शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या सोहळ्यात  मारुती ज्ञानदेव कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कांबळे हे शिरोळ येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून, ते सामाजिक, तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय आहेत. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये सलग तीन वर्षे प्रकल्पाचे सादरीकरण करत विशेष यश संपादन केले आहे. आजवर निसर्ग चित्रकला स्पर्धा, विविध सामाजिक उपक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम यांसारख्या असंख्य उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग दर्शवला आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक असण्याबरोबरच ते एक उत्तम कवी म्हणूनही परिचित आहेत.

विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम करत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर भर देण्यात त्यांचा कल आहे. ते एक उत्तम चित्रकार असून, आपल्याकडील कलेचा ते विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करत असतात. नुकत्याच झालेल्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत त्यांच्या दोन्हीही मुलींच्या संघांना विजेता व उपविजेता अशी पारितोषिके मिळाली आहेत.

हा गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी शहापूर आदिवासी प्रकल्पाची फौज या ठिकाणी कार्यरत होती. या वेळी इरनक (प्रकल्पस्तरीय अध्यक्ष) रंजना उघडा, जानू हिरवे, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, शिक्षण विभागाचे विजय भडगावकर, शाहपूर प्रकल्प अधिकारी धनंजय जाधव, रवींद्र घोलप, शिक्षण विस्तार अधिकारी पी. वाय. देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link