Next
भारतात ‘बेटर बस चॅलेंज’चे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, April 07, 2018 | 05:22 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : ‘डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर फॉर सस्टेनेबल सिटीज’तर्फे जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी असलेली आणि फेडेक्स कॉर्पची (एनवायएसई: एफडीएक्स) उपकंपनी असलेली फेडेक्स एक्स्प्रेस यांच्या सहकार्याने आज ‘बेटर बस चॅलेंज’ या स्पर्धेची घोषणा केली.

भारतातील सार्वजनिक बस यंत्रणेचा दर्जा, सुरक्षितता आणि क्षमता सुधारण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या खुल्या नवीन्यपूर्णता स्पर्धेच्या निमित्ताने उत्पादक, तंत्रज्ञान व सेवा पुरवठादार, दळणवळण उद्योजक, सेवाभावी संस्था, पालिका प्रशासन आणि दळणवळण सेवा यंत्रणा यांच्यातर्फे परस्परांच्या सहकार्याने सार्वजनिक बस सेवा क्षेत्रातील उपाययोजनांच्या कल्पना समोर येतील.

देशभरातील विविध राज्यांमधील सार्वजनिक बसमधून सुमारे ७० दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे भारतभरातील शहरांमधील नागरिकांना जोडण्यात या बस महत्त्वाची भूमिका पार पाडतात. भारतभरात सार्वजनिक बस सेवेचे संचलन करणाऱ्या ट्रान्सिट एजन्सी सुमारे ६० टक्के प्रवाशांना वाहून नेतात आणि मागणीनुसार सेवा पुरविणाऱ्या दळणवळण सेवेशी ही बससेवा स्पर्धा करते आणि अधिक आरामदायी आणि दर्जेदार सेवा त्यांच्याकडून दिली जाते.

भारतात सार्वजनिक बस सेवा यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित करताना ‘डब्ल्यूआरआय इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओ. पी. अगरवाल म्हणाले, ‘२०२१ सालापर्यंत भारताला दळणवळण आवश्यकतांसाठी ६५० हजार बसची आवश्यकता भासणार आहे. धोरणकर्त्यांनी नागरी दळणवळणासंदर्भात आपला दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याची गरज आहे. दळणवळणाच्या पारंपरिक प्रारूपांपलीकडे जाऊन वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी शाश्वत व पर्यावरणस्नेही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.’

या स्पर्धेमध्ये तीनपैकी एक आव्हान स्वीकारायचे आहे: संचलन व्यवस्थापन आणि क्षमता, नवीन सेवा प्रारुपे आणि प्रवासी अनुभव. ‘बेटर बस चॅलेंज’ स्पर्धेतील अंतिम तीन उपाययोजनांना प्रत्येकी ५० हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच ३२ लाख रुपये इतका आर्थिक पुरस्कार देण्यात येणार आहे. या रोख पारितोषिकाबरोबरच शहरातील गरजांची पूर्तता करणाऱ्या उपाययोजनांची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी ट्रान्सिट एजन्सींकडून वर्षभर मार्गदर्शन मिळणार आहे. ट्रान्सिट एजन्सींमधील चँपियन वर्षभर चालणाऱ्या प्रात्यक्षिक प्रकल्पांचे व्यवस्थापन करतील आणि ‘डब्ल्यूआरआय इंडिया’च्या मदतीने त्यांचा परिणाम जोखतील.

सेवेचा दर्जा आणि वाहनांचा ताफा व इंधनाची निवड आणि प्रशिक्षण यासारख्या समस्यांवर मात करून सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी शहरांना सहकार्य करण्यासाठी ‘फेडेक्स’ आणि ‘डब्ल्यूआरआय इंडिया’ गेली सात वर्षे एकत्र काम करत आहेत. जगभरात या सहयोगाने सुमारे पाच  दशलक्ष दैनंदिन प्रवाशांना मदत केली आहे. नऊ हजारांहून अधिक ट्रान्सिट व्यावसायिकांना प्रशिक्षित केले आहे आणि ६३ हजार ९०८ टन एवढ्या कार्बन उत्सर्जनात कपात केली आहे.

‘लोक जितके अधिक एकमेकांशी जोडलेले असतात, तितकी त्यांची अधिक भरभराट होते. ‘बेटर बस चॅलेंज’ला सहकार्य करताना आम्ही रोमांचित झालो आहोत आणि या वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठाच्या माध्यमातून भारतातील सार्वजनिक बस सेवा यंत्रणेबाबत नावीन्यपूर्ण उपाययोजना तयार करण्यासाठी भागधारकांना प्रोत्साहित करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यामुळे येथील बससेवा परवडणारी, सुलभतेने उपलब्ध आणि प्रत्येकासाठी शाश्वत अशी असेल’, असे फेडेक्स एक्स्प्रेस मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिकेचे विभागीय अध्यक्ष जॅक मूह्स म्हणाले.

‘भारतात सार्वजनिक बस वाहतूक सेवा हा दोन तृतियांश प्रवाशांसाठी आधारस्तंभ असून या माध्यमातून प्रवासी आपली नोकरी, शाळा, आरोग्यसेवा आणि आर्थिक संधी असलेल्या ठिकाणांशी जोडले जातात’, असे डब्ल्यूआरआय इंडियाच्या इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट विभागाचे संचालक अमित भट्ट म्हणाले.  

अधिक माहितीसाठी : http://www.wricitieshub.org/betterbuschallenge
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search