Next
दिनमणी
BOI
Saturday, July 01, 2017 | 10:15 AM
15 1 0
Share this story

आपल्या तेजाने दिवसभर तळपणारा मणी या अर्थानं सूर्याला दिनमणी म्हटलं जातं, हे आपल्याला माहीत आहे. त्याच नावाचं एक सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर आजपासून सुरू होत आहे. त्या सदराच्या माध्यमातून प्रामुख्याने साहित्य, कला, मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रांत आपल्या नवनवोन्मेषशाली प्रतिभेनं तळपणाऱ्या तेजस्वी मण्यांची माळ आपल्यापुढे सादर केली जाणार आहे. हे मणी म्हणजे साहित्य-संस्कृती क्षेत्रात आपलं स्वतंत्र अस्तित्व असलेले तारे आहेत. या मान्यवर व्यक्तींचा जन्मदिवस, पुण्यतिथी किंवा त्यांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या दिवसाचं औचित्य साधून त्यांची अल्प ओळख करून देण्याचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न या सदरातून केला जाणार आहे. 
..........
डॉ. श्रीपाल मोहन सबनीस

पिंपरी-चिंचवडमध्ये भरलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर्वांना परिचित झालेल्या डॉ. श्रीपाल सबनीस यांचा एक जुलै हा जन्मदिन. मूळचे मराठवाड्यातल्या एका जमीनदार कुटुंबातले असलेले डॉ. सबनीस आयुष्यात वेगवेगळ्या चळवळींचा आणि कलाविष्कारांचा अनुभव घेतलेले लेखक आहेत. 

दादा कोंडकेंच्या ‘विच्छा माझी...’ने प्रभावित होऊन ‘शुक्राची तू चांदणी’सारखे वगनाट्य त्यांनी लिहिले आहे. राजकारणावर आधारित ‘सत्यकथा ८२’ किंवा ‘क्रांती’सारख्या राज्यस्तरीय पारितोषिकविजेत्या एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत. आदिवासी पाड्यावर जाऊन डफावर थाप देत शाहिरीही त्यांनी केली आहे. पुढे त्यांनी समीक्षेची वाट चोखाळली. अशा या विविध पैलू असलेल्या डॉ. सबनीस यांना स्वामी स्वरूपानंद पुरस्कार, डी. डी. कोसंबी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘मुक्तक,’ ‘उपेक्षितांची पहाट,’ ‘ज्ञानेश्वर ते आंबेडकर,’ ‘भारतीय प्रबोधन आणि नवआंबेडकरवाद,’ ‘साने गुरुजी विचारसमीक्षा,’ ‘नामदेवांचे संतत्व आणि कवित्व’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link