Next
‘गोयल गंगा’तर्फे विशेष मुलांसाठी आंबा फेस्टचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, June 10, 2019 | 03:19 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आंब्याचा गोडवा समाजातील वंचित मुलांना चाखता यावा यासाठी नगर रोड येथील चोखी दाणी येथे गोयल गंगा फाउंडेशनतर्फे ‘आंबा फेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. यात ४५०हून जास्त चिमुरडयांनी आंब्याचा मनमुराद आनंद लुटला.

या वेळी समाजसेवक प्रदीप लोखंडे, गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल, अमित गोयल, चोखी दाणीचे अध्यक्ष अमित कुमार उपस्थित होते. चोखी दाणीमधील रुचकर जेवणाबरोबरच मॅजिक शो, पपेट शो, गाणे, नृत्यकला, राजस्थानी गाणी-नृत्य आणि एकूणच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा मुलांनी आनंद घेतला.


रॉबिन हूड आर्मी संस्थेने शहरातील अनेक वेगवेगळ्या भागांमधून ४००हून अधिक वंचित मुलांना या ठिकाणी आंब्याचा आस्वाद घेता यावा यासाठी एकत्र आणले होते. याशिवाय सोफोशमधील ४० हून अधिक विशेष मुलेही यात सहभागी झाली होती. रॉबिन हूड आर्मीच्या स्वयंसेवकांनी या मुलांना सांभाळण्यासाठी हातभार लावला. 


या प्रसंगी मुलांशी संवाद साधताना समाजसेवक प्रदीप लोखंडे म्हणाले, ‘भविष्यात आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रातच काम करा. त्यात काम करताना तुमचे स्वतःचे वेगळेपण जोपासा आणि नेहमी लक्षात ठेवा आपल्यातील प्रत्येकजणाचे  समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा आपल्या कमाईमधील काही भाग गरजू लोकांच्या आयुष्य बदलण्यासाठी सत्कारणी लावा.’

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search