Next
अन्नदान करणारे ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ
BOI
Friday, July 12, 2019 | 11:51 AM
15 0 0
Share this article:

सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाने गावाला परमार्थाची गोडी लावली. ग्रामदैवत श्री हनुमानाच्या भव्य मंदिराच्या उभारणीत पुढाकार घेतलेले हे भजनी मंडळ अन्नदान करण्यातही अग्रेसर राहिले आहे. वारकरी असो वा बाहेरगावचे, कोणतेही लोक मंदिरात आले तर त्यांच्यावर कधीच उपाशी झोपण्याची वेळ येत नाही. त्यामुळे या भजनी मंडळाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 

रोपळे गावातील ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमानाच्या भव्य मंदिराच्या उभारणीत ज्ञानेश्वर भजनी मंडळाने पुढाकार घेतला होता. मंदिर उभारणीत लोकसहभाग मिळवण्याचे महत्त्वाचे कार्य या मंडळाने केले आहे. या मंडळाचे विश्वंभर कदम हे आळंदी येथील एका संस्थेत भजन-कीर्तन शिकत होते. त्यामुळे येथील भजनी मंडळाने संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ असे नाव आपल्या भजनी मंडळाला दिले. या भजनी मंडळात सुमारे पंचवीस आबालवृद्ध सदस्य असून सुमारे तीस वर्षांपासून हे मंडळ कार्यरत आहे. या भजनी मंडळाच्या पुढाकारातून गावकरी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करतात. त्यामुळे रोपळेतील हनुमान जन्मोत्सव सोहळा मुख्य आकर्षण ठरला आहे. या मंडळाला सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, हिंगणगाव व लांडगेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. 

या मंडळातील बबन महाराज खपाले व विश्वंभर महाराज कदम हे दोघे भजनाबरोबरच कीर्तन व भारूडही करतात. याबाबत विश्वंभर कदम म्हणाले, ‘आमच्या गावात एका वेळी शे-दोनशे लोक मुक्कामाला आले, तर आमचे भजनी मंडळ प्रसंगी माधुकरी मागेल, पण त्यांच्या भोजनाची व्यवस्था करील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search