Next
डॉ. आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण स्वरांजली
मिलिंद जाधव
Friday, December 07, 2018 | 12:50 PM
15 0 0
Share this article:



मुंबई :
सहा डिसेंबर रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंजिरात भीमांजली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम तालविहार प्रस्तुत होता. सकाळी सहा वाजता झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या उपक्रमाला यंदा तीन वर्ष पूर्ण होत आहेत. 

भीमांजली या कार्यक्रमात दर वर्षी प्रतिभावंत कलाकार सहभागी होऊन महामानवाला स्वरांजली अर्पण करतात. अमेरीकन संगीतकार, बासरीवादक नॅश नॉबर्ट, सतारवादक उस्ताद रफिक खान, उस्ताद शाफिक खान, व्हायोलीन वादक डॉ. संगीता शंकर, तबलावादक पंडित मुकेश जाधव या मान्यवर कलावंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वरांजली अर्पण केली. 



‘या कार्यक्रमासाठी सर्व आंबेडकरी तरुण वर्ग पहाटेच्या वेळी पांढरेशुभ्र कपडे परिधान करून मोठ्या संख्येने एकत्र झाला. ही एका नव्या चळवळीची चाहूल आहे,’ असे राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक आयएएस हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त निखिल मेश्राम, अतिरिक्त आयुक्त अनिता मेश्राम, आयएएस संजय चांदे, आयएएस गजभिये, आयएएस विजय वाघमारे यांच्यासह पोलीस अधिकारी कनकरत्न, धनंजय कमलाकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

भीमांजली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय कदम यांनी केले. या कार्यक्रमानंतर रवींद्र नाट्य मंदिर ते चैत्यभूमीपर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search