Next
मधुराज् रेसिपी
BOI
Friday, October 12, 2018 | 10:41 AM
15 0 0
Share this story

स्वयंपाक करताना पदार्थ रुचकर करण्याबरोबरच व्यवहार ज्ञानही महत्त्वाचे असते. पूर्व नियोजन केल्यास स्वयंपाक करताना घाईगडबड होत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मधुरा बाचल यांनी ‘मधुराज् रेसिपी’ या पुस्तकातून विविध शाकाहारी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत.

स्वयंपाकाचे नियोजन कसे करावे, आवश्यक टिप्स, मातीची भांडी कशी वापरावी याचे उपाय सांगितले आहेत. पदार्थांना मसाल्यामुळे चव येत असल्याने ते तयार करण्याची पद्धत यात आहे. चहा, सरबत-मॉकटेल्स, नाश्त्याचे पदार्थ, रव्याचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलेड, भात-डाळ-आमटीचे प्रकार, सुक्या व ग्रेव्हीच्या भाज्या, पोळ्या यांच्या असंख्य कृती आहेत.

याशिवाय दिवाळीचा फराळ, वाळवणाचे पदार्थ, गोड, चमचमीत पदार्थ आणि अगदी केक, कुल्फी, आईस्क्रिम व लस्सी घरच्या घरी कशी बनवायची हे यातून समजते. उरलेल्या भाताचे कोणते पदार्थ तयार होतील हे सांगितले आहे. शाकाहारीप्रमाणेच मांसाहारी पाककृतींवर बाचल यांचे स्वतंत्र पुस्तक आहे.

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाउस
पाने : ३३६
किंमत : २६० रुपये

(मधुराज् रेसिपी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link