Next
‘आचार व विचार यांच्यातील अंतर कमीतकमी असावे’
पोलिस आयुक्त के. वेकंटशम यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, January 08, 2019 | 05:10 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘जीवनातील आचार व विचार यांच्यातील अंतर कमीतकमी झाल्यास त्याचा फायदा निश्‍चितच होतो. या शिबिरांच्या माध्यमातून फार मोठी संधी मिळालेली आहे,’ असे प्रतिपादन पोलिस आयुक्त के. वेकंटशम यांनी केले.
 
भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल व चांदमल मुनोत ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने २७वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वायनस्टंन, महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कालरा, ‘बीजेएस’चे संस्थापक, शांतीलाल मुथ्था, डॉ. के. एच. संचेती, डॉ पराग संचेती व उपाध्यक्ष (प्रशासन) महेंद्र अ‍ॅंड महेंद्र विजय नायर उपस्थित होते.

डॉ. वेकंटशम म्हणाले, ‘चांगले काम करण्यासाठी विशाल मन लागते. आयुष्यात जबाबदारी व दायित्वातून चांगले काम करण्याची संधी मिळत असते. जेव्हा नि:स्वार्थी भावनाने समाजासाठी काम करतात, तेव्हा त्याचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडतो. ज्या लोकांचा आचार आणि विचारांमध्ये फरक नसतो, ते समाजात आदर्श असतात. या निमित्ताने पुण्यातील अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम व हेल्मेट वापरण्याची सर्व दुचाकीधारकांनी सवय लावली पाहिजे.’  

कालरा म्हणाले, ‘महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा कंपनीने उद्योजकता जगात व्यवसायासोबत सामाजिक जबाबदारीने विविध समाजोपयोगी प्रकल्पांना मदत करत आहे. समाजातील गरजू व गरीब मुलींच्या रुग्णसेवेसाठी कंपनी कटीबद्ध आहे. पर्यावरण चळवळीमध्ये सातत्याने कंपनी प्रयत्नशील आहे. सामाजिक दाायित्व निधीतून वेगवेगळ्या योजनेसाठी निधी खर्च करीत आहे. संचेती हॉस्पिटलने सतत सामाजिक  दाायित्वाने रुग्णसेवा केलेली आहे, ही भूषणास्पद बाब आहे.’
 
प्रास्तविक करताना डॉ. संचेती म्हणाले, ‘२७ वर्षांपूर्वी लावलेल्या रुग्णसेवेच्या वेलीचे रूपांतर आज विशाल वृक्षामध्ये झाले आहे. सातत्याने चालणारा सेवेचा यज्ञ हा शरदकुमार दीक्षितांच्या प्रेरणने अखंड चालू राहणार आहे.’

डॉ. के. एच. संचेती म्हणाले, ‘डॉ. शरदकुमार दीक्षितांचे रुग्णसेवेचे अपूर्ण राहिलेले कार्य या माध्यमातून पूर्ण होत आहे. त्यामुळे आयुष्यात मिळणार्‍या संधीचे सोने करता आले पाहिजे.’

श्री. मुथ्था म्हणाले, ‘२७ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या मानवता सेवेच्या यज्ञामुळे हजारो गरजू रुग्णांना याचा फायदा झालेला आहे. या सेवेमुळे संचेती हॉस्पिटलचे संपूर्ण भारतात नाव झालेले आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींना या शिबिराचा उपयोग होत आहे.’

या शिबिराचा लाभ ८०० रुग्णांना झाला. चार दिवसांत डोळ्यांच्या पापण्या, नाक व कान संदर्भात, दुंभगलेले ओठ, चेहर्‍यावरील व्रण असणाऱ्या २५० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. डॉ. चैताली बेटावाडकर व दीपक बिचे यांनी सूत्रसंचालन  केले. शशिकांत मुनोत यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी राहुल चोबे, डॉ. अमोल भामरे, अजिनाथ रोठे, विशाल सांडभोर, गणेश  भिंगारदिवे, विजय कासार यांचे सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search