Next
गीत रामायणावर आधारित भरतनाट्यम् नृत्याविष्कार
प्रेस रिलीज
Thursday, March 29 | 11:33 AM
15 0 0
Share this story


पुणे : रामनवमीचे औचित्य साधून ‘संतोष पोतदार इव्हेंट्स आणि कलादर्शन प्रॉडक्शन्स’तर्फे, ज्येष्ठ कवि ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांची अजरामर कलाकृती ‘गीत रामायणा’वर आधारित भरतनाट्यम् नृत्याविष्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गीत रामायणातील ‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘नकोस नौके परत फिरू गं’, अशा अवीट गोडीच्या गाण्यांवर नृत्ये सादर करून, कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. 

ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक पं. सुहास व्यास, गदिमांचे नातू सौमित्र माडगूळकर, गुरू सौदामिनी राव, ‘पृथ्वी एडिफिस’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अभय केले, ‘ज्ञान देवी’ संस्थेच्या प्रमुख अनुराधा सहस्त्रबुध्दे, ‘संस्कार भारती’चे सचिव सारंग कुलकर्णी, संतोष पोतदार इव्हेंट्सचे प्रमुख संतोष पोतदार यांनी दीपप्रज्वलन करून, कार्यक्रमाची सुरुवात केली. 

गदिमा आणि बाबूजींच्या गीत रामायणातील निवडक १४ गाण्यांवर, अमिता गोडबोले आणि कल्पना बालाजी यांच्या सहा शिष्यांनी भरतनाट्यम् नृत्य सादर केले. या कलाकरांनी आपल्या बहारदार भरतनाट्यम् नृत्याविष्कारातून, गीत रामायणाची अविस्मरणीय अनुभूती रसिकांना दिली. ‘भुवरी रावण वध झाला’, आणि ‘त्रिवार जय जयकार’ 
या नृत्यरचनेद्वारे प्रभू श्रीरामांचा विजय साजरा करून, कलाकारांनी या कार्यक्रमाचा समारोप केला.

गुरू सौदामिनी राव यांच्या संकल्पनेतून आणि नृत्य दिग्दर्शनातून साकारलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती संतोष पोतदार, अमिता गोडबोले आणि कल्पना बालाजी यांनी केली होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link