Next
राष्ट्रवादी काँग्रेस, चिंतामणी ज्ञानपीठातर्फे २० जुलैला पुण्यात गुरुपौर्णिमा उत्सव
BOI
Wednesday, July 17, 2019 | 01:59 PM
15 0 0
Share this article:

पुणे : दर वर्षीप्रमाणे यंदाही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिंतामणी ज्ञानपीठ यांच्यातर्फे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी डॉ. अनिल अवचट, डॉ. डी. बी. शेकटकर, कॉ. मुक्ता मनोहर व ओमप्रकाश रांका या मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. 

शनिवारी (२० जुलै) सकाळी नऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या वेळी ते मार्गदर्शनही करतील.

गेली १४ वर्षे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने दर वर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून समाजातील ऋषीतुल्य मान्यवरांचा सन्मान केला जातो. ‘आपल्या कार्यातून बहुमूल्य योगदान देणारी ही व्यक्तिमत्त्वे नेहमीच आपल्या प्रेरणास्थानी असतात. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करत असतो आणि समाजही त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होत असतो. अशा ऋषीतुल्य व्यक्तींच्या कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला जातो’, असे कार्यक्रमाचे संयोजक आप्पा रेणुसे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

आजवर डॉ. के. बी ग्रँट, डॉ. अनू आगा, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, चंदू बोर्डे, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. राम टाकवले, ज्येष्ठ लेखक द. मा. मिरासदार, अभिनेते नाना पाटेकर, डॉ. शरद हर्डीकर, डॉ. भास्कर आव्हाड, रसिकशेठ धारीवाल, सुचेता चापेकर, किर्ती शिलेदार, विद्या बाळ, प्रमिलाताई सांकला या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे. 

भारतीय संस्कृती व गुरूजनांची ओळख नवीन पिढीला व्हावी याच हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक आप्पा रेणुसे आणि मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search