Next
पाणीटंचाईवर मात करून फुलवलेली डाळिंब शेतीची श्रीमंती कौतुकास्पद
सांगोल्यातील डाळिंबशेतीबद्दल डॉ. शरद गडाख यांचे उद्गार
BOI
Wednesday, August 14, 2019 | 09:16 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
डाळिंबांचे गांव म्हणून लौकिक असलेल्या सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्राने डाळिंब प्रक्षेत्र भेट व चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांतर्गत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन डाळिंब शेतीच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. 

डाळिंब शेतकऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करून जलसंधारणाद्वारे फुलवलेली डाळिंब शेतीची श्रीमंती ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे मत डॉ. गडाख यांनी व्यक्त केले. ‘तेलकट डाग व मर रोग या समस्येवर मात करण्याकरिता शेतकऱ्यांनी विद्यापीठाने डाळिंब पिकासाठी केलेल्या विविध शिफारशींचा अवलंब करावा,’ असे ते म्हणाले. विद्यापीठ करत असलेल्या कमी पाण्यावरील पिकांच्या संशोधनाविषयीची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. 

डाळिंब पीक संशोधन व प्रसारात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाटा मोलाचा असल्याचे मत अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी व्यक्त केले. ‘विपणनाच्या दृष्टीने सांगोला डाळिंब हब करायचे असेल, तर मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मत त्यांनी मांडले. 

या वेळी डॉ. विजय अमृतसागर (सहयोगी संशोधन संचालक व प्रमुख, विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्र, सोलापूर), मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ प्रा. अजय दिघे, उद्यानविद्या शास्त्रज्ञ प्रा. किरण जाधव, सरपंच अर्जुन कोळवले, उपसरपंच धर्मराज शेंबडे, प्रगतिशील शेतकरी विजय येलपले, राजाराम येलपले आणि इतर डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

डॉ. शरद गडाख यांनी मोहोळ कृषी विज्ञान केंद्र आणि विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्रास भेट देऊन विस्तार व संशोधन उपक्रमांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी कृषी विज्ञान केंद्राला विविध प्रात्यक्षिक युनिट उभारणीसाठी मार्गदर्शक सूचना केल्या. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search