Next
‘डीकेटीई’तर्फे शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश
प्रेस रिलीज
Monday, March 18, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयाना मदतीचा धनादेश सुपूर्द करताना केनिचिरो कंम्बे, कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, डॉ. सपना आवाडे, राहुल आवाडे, डॉ. पी. व्ही. कडोले आदी.

इचलकरंजी : ‘डीकेटीई’मध्ये आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनातील जेवणाचा खर्च टाळून ही पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्रातील वीरपुत्र नितीन राठोड व संजय राजपूत यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली. संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हा निधी संकलित केला होता.

गेलेले जवान पुन्हा येणार नाहीत; पण कर्तव्याप्रती भावना ठेऊन कुटुबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. संपूर्ण देश राठोड व राजपूत कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची भावना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. ‘डीकेटीई’ व लोकसहभागातून पाच लाख रुपयांची मदत वीरपत्नी वंदना राठोड, मुलगी जिविका व कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आली.

शिक्षण घेत असताना विद्यार्थी दशेत समाजाशी असलेले नाते संबंध जपण्याची शिकवण ‘डीकेटीई’मध्ये दिली जाते. या अंतर्गत संस्थेमध्ये आयोजित एका कार्यक्रमावेळी किर्लोस्कर टोयाटा टेक्स्टाइलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर केनिचिरो कंम्बे यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला.

या वेळी संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे, ‘डीकेटीई’चे  सर्व विश्‍वस्त, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांच्यासह नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search