Next
पूनावाला फाउंडेशनद्वारे तीनशेपेक्षा जास्त मुलींना शिष्यवृत्ती
प्रेस रिलीज
Monday, July 09, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शिष्यवृत्ती प्रदान करताना डॉ. सारिका देवरे व लीला पूनावाला
पुणे : लीला पूनावाला फाउंडेशनने यंदा तीनशेपेक्षा जास्त मुलींना शिष्यवृत्ती दिली आहे. शुक्रवारी बालेवाडी येथील एफएमएच साभागृहात हा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा पार पडला. या वेळी पद्मश्री लीला पूनावाला, मुख्य अतिथी म्हणून लीला फेलो डॉ. सारिका देवरे आणि ‘मिसेस इंडिया २०१८’ शिवानी नायक शाह उपस्थित होत्या, तर दुपारच्या सत्रामध्ये लीला फेलो डॉ. ऋता लिमये उपस्थित होत्या. शिष्यवृत्ती प्राप्त मुलींचे पालकही या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी सर्व पालकांना मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले.

दर वर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना इयत्ता सातवी ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. आर्थिक मदतीबरोबरच शालेय मुलींना स्कूल बॅग, सायकल, शूज आणि पुस्तकेही देण्यात येतात. 

या वेळी पद्मश्री लीला पूनावाला म्हणाल्या, ‘पालकांनी मुलींच्या लग्नासाठी हुंडा देण्याऐवजी ते पैसे त्यांच्या शिक्षणावर खर्च करावे. ज्यामुळे त्या आपल्या जीवनात अधिक सक्षम बनतील.’

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीनींसह फिरोज पूनावाला,  लीला पूनावाला,    डॉ. सारिका देवरे,  शिवानी नायक शाह, डॉ. ऋता लिमये आदी
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link