Next
‘बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी’
मराठी शिक्षण कायदा आणि भाषा प्राधिकरणाच्या मागणीसाठी ‘कोमसाप’ची जनजागृती मोहीम
BOI
Tuesday, March 19, 2019 | 02:50 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘राज्यात मराठी शिक्षण कायदा आणि भाषा प्राधिकरण होण्याच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने (कोमसाप) जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात बारावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करावी, यासह अनेक मागण्यांचा त्यात समावेश आहे,’ अशी माहिती ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी दिली. 

जनजागृतीच्या या चळवळीमध्ये विविध स्तरांतील भाषाप्रेमी सहभागी झाले असून, या संदर्भात ३० मार्च २०१९ रोजी मुंबईतील नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात एक सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे, असेही डॉ. केळुस्कर यांनी स्पष्ट केले. 

डॉ. केळुस्कर म्हणाले, ‘केरळमध्ये मल्याळम, कर्नाटकमध्ये कानडी, तमिळनाडूमध्ये तमिळ भाषा अनिवार्य आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रात बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असायला हवी. आमचा इंग्रजीला विरोध नाही; मात्र इंग्रजी शाळांकडे ओढा वाढतो आहे आणि मराठी शाळा बंद पडत आहेत. ज्यांना मराठीत शिक्षण घ्यायचं आहे, त्यांनाही शिक्षक किंवा शाळांअभावी ते शक्य होत नाही. मराठी भाषेला अन्य भाषांचा पर्याय ठेवण्यात आला आहे. तसे न करता मराठी भाषेचा विषय अनिवार्य असायला हवा, अशी आमची मागणी आहे.’

या संदर्भात जनजागृती करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेले निवेदन सात जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘कोमसाप’च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना स्वतंत्रपणेही ते पाठवण्यात आले आहे. या मोहिमेला उद्योजक, खेळाडू यांसह समाजाच्या सर्व स्तरांतील आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाकडून पाठिंबा मिळत असल्याचे डॉ. केळुस्कर यांनी नमूद केले. 

मराठी शिक्षण कायदा आणि भाषा प्राधिकरणाची गरज यांबद्दल जनजागृतीसाठी परिसंवाद, चर्चा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली ३० मार्चला मुंबईत सहविचार सभा होणार आहे. त्यात परिसंवादही होणार असून, राजकीय नेतेही सहभागी होणार आहेत. त्या वेळी सुकाणू समितीची स्थापना केली जाणार आहे.

‘प्रत्येक पक्षाने याकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. सर्व राजकीय पक्षांना आमचे आवाहन आहे, की त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्येही या मुद्द्याचा अंतर्भाव केला पाहिजे,’ असे डॉ. केळुस्कर म्हणाले.

(डॉ. केळुस्कर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. मराठीच्या विविध बोलीभाषांबद्दलचा लेख आणि व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 155 Days ago
British never made it compulsory to learn English . People realised That it would be to their Advantage to learn it . So They did it , of their will .o
0
0
Bal Gramopadhye About 156 Days ago
People will learn a language only if they'd genuinely wish to . Look at What happened to the Russian language in Eastern Europe , controlled By Russians.
0
0

Select Language
Share Link
 
Search