Next
बाळ सामंत, जी. के. चेस्ट(र)टन
BOI
Tuesday, May 29 | 03:45 AM
15 0 0
Share this story

रिचर्ड बर्टन या अलौकिक अवलियाचं चरित्र ‘शापित यक्ष’ पुस्तकातून मांडणाऱ्या बाळ सामंतांचा आणि प्रसिद्ध ब्रिटिश समीक्षक आणि लेखक जी. के. चेस्ट(र)टन यांचा २९ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
........
बाळ गंगाधर सामंत 

२९ मे १९२४ रोजी जन्मलेले बाळ सामंत हे विनोदी कथाकार आणि चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मुंबईचा सांगोपांग इतिहास सांगणारं ‘एक होती मुंबई’ हे पुस्तक, मृत्यू या विषयावर विस्तृत चर्चा करणारा ‘मरणात खरोखर जग जगते’ हा ग्रंथ आणि रिचर्ड बर्टन या अलौकिक अवलियाचं ‘शापित यक्ष’ हे चरित्र ही त्यांची अफाट गाजलेली आणि लोकप्रिय पुस्तकं आहेत.

प्रेमग्रंथ, खिरापत, गोंधळ, नवरा बायको, करामत, खुशमस्करी, तो राजहंस, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, एक होती मुंबई, मैफल, निवडक अत्रे, विनोदी चुटके, विवाह संस्कार, बाळबोध, मराठी नाट्यसंगीत, स्वरानुबंध, अशी त्यांची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१८ जानेवारी २००९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(बाळ सामंत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
...............

गिल्बर्ट चेस्ट(र)टन 

२९ मे १८७४ रोजी केन्सिंग्टनमध्ये जन्मलेला गिल्बर्ट कीथ ऊर्फ जी. के. चेस्ट(र)टन हा कवी, कादंबरीकार, नाटककार, पत्रकार, समीक्षक आणि तत्त्ववेत्ता म्हणून प्रसिद्ध होता. रॉबर्ट ब्राउनिंग, चार्ल्स डिकन्स, बर्नार्ड शॉ, स्टिव्हन्सन, विल्यम ब्लेक वगैरे साहित्यिकांच्या साहित्याची त्याने केलेली समीक्षा गाजली होती. 

‘ऑन रनिंग आफ्टर वन्स हॅट’, ‘ए डिफेन्स ऑफ नॉनसेन्स’ यांसारखे त्याचे निबंध लोकप्रिय होते. त्याने निर्माण केलेली ‘फादर ब्राउन’ ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली आणि लोकांना आवडून गेली. पेशाने धर्मगुरू असणारा हा ब्राउन डिटेक्टिव्ह बनून गुन्ह्यांची उकल करत असे, ते फार रंजक होतं. त्याने फादर ब्राउन या व्यक्तिरेखेच्या अनेक कथा लिहिल्या.

१४ जून १९३६ रोजी त्याचा बिकन्सफिल्डमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link