Next
‘वी सायकल अँड वी वॉक’चे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, February 09 | 04:13 PM
15 0 0
Share this storyपुणे :
आरोग्य, सुरक्षितता आणि शाश्वतता हे प्रमुख घटक म्हणजे थियेस्सनक्रपचे कॉर्पोरेट धोरण आहे. थियेस्सनक्रपचे तब्बल ७०० कर्मचारी ‘वी सायकल अँड वी वॉक’ या उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यात सायकल चालवत ऑफिसला गेले. पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागरुकता पसरवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.

३०० कर्मचारी १२ किलोमीटरपर्यंत सायकल चालवत आणि ४०० कर्मचारी तीन किलोमीटरपर्यंत चालत ऑफिसला गेले. यामध्ये थियेस्सनक्रप इंडस्ट्रीज इंडियाचे एमडी आणि सीईओ मलाय दास आणि थियेस्सनक्रप इंडस्ट्रीज इंडियाचे सीएफओ जी. व्ही. केतकर यांचाही समावेश होता.

कंपनीच्या आवारात कार किंवा बाईक्सना प्रवेश नव्हता आणि कर्मचाऱ्यांना सायकल किंवा सार्वजनिक वाहनांनी ऑफिसला ये-जा करायची होती. सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनही पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते.

‘थियेस्सनक्रपच्या शाश्वत प्रयत्नांसाठी पर्यावरणीय संरक्षण हा प्रमुख घटक आहे. ऑफिसपर्यंत चालत येणे हे आरोग्यासाठी चांगले आहेच, शिवाय आपले जीवनमानही सुधारते आणि याव्यतिरिक्तचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याने, पर्यावरणाला याचा लाभ होतो,’ असे थियेस्सनक्रप इंडस्ट्रीज इंडियाचे एमडी आणि सीईओ मलाय दास म्हणाले.

प्रदूषण आणि पर्यावरणाचा वाढता धोका हा समकालीन सिनारिओतील प्रमुख घटक आहे. स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाच्या खात्रीसाठी महत्त्वाची पाऊले टाकण्यात आली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link