Next
दुष्काळातही सोलापूरच्या आमराईत आंबे लगडले
BOI
Tuesday, May 07, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this article:

घोटी (ता. करमाळा) येथील रेवणनाथ पाटील यांच्या आमराईतील फोटो.

सोलापूर : जिल्ह्यात सध्या भयाण दुष्काळी परिस्थिती असतानाही घोटी (ता. करमाळा) येथील आंबा उत्पादक रेवणनाथ पाटील यांच्या बागेत झाडाला पिकलेले आंबे लगडलेले असल्याचे चित्र अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाहायला मिळाले. 

आंबा हे फळ सर्वांच्याच आवडीचे; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक आमराया पाण्यावाचून वाया गेल्या आहेत. स्थानिक बाजारपेठेत सध्या परराज्यातील आंबा विक्रीसाठी आला आहे. सोलापुरातील हवामानात उत्पादित झालेला आंबा बाजारपेठेत पोहोचतच नसल्यामुळे आंबाप्रेमींची यंदा पार निराशाच झाली आहे. सात मे २०१९ अक्षय्य तृतीया असून, साडेतीन मुहुर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या या सणात आंब्याला फार महत्त्व आहे. काही लोक याच दिवसापासून आंबा खायला सुरुवात करतात. त्यामुळे या दिवसापासून बाजारपेठेत आंब्याला मागणी जास्त राहते; मात्र बाजारात स्थानिक आंबा विक्रीसाठी येत नसल्यामुळे अनेकांना साका पडलेला किंवा अनैसर्गिक पिकवलेलाच आंबा खाऊन समाधान मानावे लागत आहे. 

आपल्याकडील केशर व विविध गुणवैशिष्ट्ंयाचे आंबे दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध न झाल्यामुळे आंबाप्रेमी निराश झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी मात्र अशा दुष्काळी परिस्थितीतही आमराया टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्याअभावी कोरड्या झालेल्या या जिल्ह्यात आमराई वाचवण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर करण्यात आला. आहे. त्यामुळे या बागेतील आंब्याची झाडे जगली असून, त्यांना आता आंबेही लगडले आहेत. 

‘या वेळी भयाण दुष्काळी परिस्थिती असतानाही आम्ही आमची आमराई टँकरने पाणी विकत आणून जगवल्याचे समाधान वाटते. किंबहुना शेतीची आवड असल्यामुळेच हे साध्य झाले,’ अशी प्रतिक्रिया घोटी येथील आंबा उत्पादक रेवणनाथ पाटील यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search