Next
‘अदानी ग्रुप’तर्फे क्रीडापटूंसाठी प्रशिक्षणाची घोषणा
प्रेस रिलीज
Friday, July 05, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : अदानी ग्रुपने भारतासाठी जागतिक दर्जाच्‍या अॅथलेटिक्‍सचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी ‘गर्व है’ या देशव्यापी आणि दीर्घकालीन उपक्रमाची घोषणा केली आहे. हा उपक्रम क्रीडा क्षेत्रातील भागधारकांपर्यंत पोहोचून त्‍यांना सक्षम करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे. 

१५ मेपासून सुरू झालेल्‍या ‘गर्व है’ या उपक्रमाला विविध क्रीडांमधील अॅथलेटिक्‍स, प्रशिक्षक, क्रीडा संस्‍थांकडून अर्ज मिळण्‍यास सुरूवात झाली आहे. २९ राज्‍यांतील १०० शहरांपर्यंत पोहोचणारा आणि पाच हजार प्रवेशिकांची पूर्तता करणारा हा उपक्रम मोठी कामगिरी करेल हा विश्वास ठेवून १५हून अधिक संभाव्‍य अॅथलेटिक्‍सना निवडण्‍यात येणार आहे. आतापर्यंत या उपक्रमाला तीन हजारांहून अधिक प्रवेशिका मिळाल्‍या आहेत. 

प्रणव अदानीया विषयी बोलताना अदानी एंटरप्राइजेज लि.चे संचालक प्रणव अदानी म्‍हणाले, ‘भारतातील क्रीडाक्षेत्रामध्‍ये प्रचंड वाढ होत असून, सरकारने संभाव्‍य खेळाडूंसाठी विविध नवीन संधी सादर केल्‍या आहेत. यात आम्‍ही पुढाकार घेत या बदलत्‍या स्थितीला अधिक चालना देणे हे एक जबाबदार कॉर्पोरेट म्‍हणून आम्‍हाला वाटते. ‘गर्व है’सह आम्‍ही उदयोन्‍मुख क्रीडा खेळाडूंच्‍या पाठिशी उभे राहून त्‍यांच्‍या प्रवासाचा भाग बनत त्‍यांच्‍या यशाला साजरे करू इच्छितो. अदानी ग्रुपच्‍या राष्‍ट्रनिर्माण आणि चांगुलपणासह विकास या मुलभूत तत्त्वाशी बांधील राहत आम्‍ही क्रीडा क्षेत्रात नवीन संधी सादर करण्‍यासाठी धोरणात्‍मक योजना सादर करत आहोत.’  

‘‘गर्व है’ उपक्रम वैयक्तिक खेळांमध्‍ये करिअर करू इच्छिणाऱ्या १४ वर्षांवरील खेळाडूंना व्‍यापक संधी असून, यात इच्‍छुकांना खडतर प्रक्रियेमधून जावे लागते. यामध्‍ये पूर्वीच्‍या यशांच्‍या आधारावर ग्रेडिंग सिस्टिम, त्‍यानंतर ‘अँगलियन मेडल हंट’द्वारे गुणात्‍मक व संख्‍यात्‍मक अभिप्राय अशा प्रक्रियेचा समावेश आहे. अँगलियन मेडल हंट ही क्रीडा व्‍यवस्‍थापन एजन्‍सी तळागाळातील प्रतिभांसाठी मार्गदर्शन उपक्रम राबवते. आंतरराष्‍ट्रीय क्रीडा व्‍यासपीठावर भारताला यश मिळवून देणे हे अँगलियन मेडल हंटचे ध्येय आहे,’ असे अडानी यांनी सांगितले.

निवडण्‍यात आलेल्‍या उमेदवारांना त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी प्रशिक्षण दिले जाते. दीर्घकालीन इनक्‍युबेशन उपक्रम अॅथलिट्सच्‍या तीन सेट्सना टोकियो ऑलिम्पिक्‍स २०२०-२०२२ एशियन अॅंड कॉमनवेल्‍थ गेम्‍स प्रोबेबल आणि भावी ज्‍युनिअर अॅथलिट्ससाठी मार्गदर्शन करण्‍याचा प्रयत्‍न करतो. पाठिंबा दिल्या जाणाऱ्या क्रीडांच्‍या यादीमध्‍ये तिरंदाजी, अॅथलेटिक्‍स, बॉक्सिंग, शूटिंग आणि कुस्‍ती अशा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

२०१६ मध्‍ये ‘गर्व है’ या प्रमुख प्रकल्‍पाच्‍या लाभार्थींमध्‍ये अंकिता रैना (टेनिस), पिंकी जंगरा (बॉक्सिंग), संजीवनी जाधव (अॅथलेटिक्‍स), मलायका गोएल (शूटिंग), मणदीप जंगरा (बॉक्सिंग), इंद्रजीत सिंग (अॅथलेटिक्‍स), खुशबीर कौर (अॅथलेटिक्‍स), शिवा थापा (बॉक्सिंग) अशा आदर्श खेळाडूंचा समावेश आहे.   

‘गर्व है’बाबत आपला अनुभव व्‍यक्‍त करत अंकिता रैना म्‍हणाली, ‘आंतरराष्‍ट्रीय पातळीवर स्‍पर्धा करण्‍याची संधी मिळणे हे प्रत्‍येक खेळाडूचे स्‍वप्‍न असते. यापैकी प्रचंड क्षमता असलेले अनेकजण आर्थिक चणचणीमुळे त्‍यांची स्‍वप्‍ने पूर्ण करू शकत नाहीत आणि म्‍हणूनच ते पदकांना गवसणी घालण्‍यापासून दूर राहतात. वंचित पार्श्‍वभूमी असलेल्‍या कुटुंबामधून असून आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवर टेनिस खेळण्‍याची क्षमता असूनही मला आवश्‍यक स्‍पर्धांमध्‍ये स्‍पर्धा करणे मला अवघड होते. वयाच्‍या १६व्‍या वर्षी राष्‍ट्रीय वुमेन्‍स चॅम्पियन असतानादेखील मी ज्‍युनिअर आयटीएफ स्‍तरामध्‍ये खेळण्‍यासाठी प्रवास करू शकली नाही; पण मला मिळालेल्‍या काही संधींसह मी अव्‍वल २००मध्‍ये रँकिंग मिळवण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली. मी ज्‍युनिअर्समध्‍ये आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर खेळण्‍याचा अनुभव चुकवला असला, तरी माझ्या करिअरमध्‍ये घडलेल्‍या दोन इतर गोष्‍टींनी माझी ध्‍येये संपादित करण्‍यामध्‍ये मदत केली. मी सॅग आणि अदानी ग्रुपचे माझ्या टेनिस प्रवासामध्‍ये योग्‍य वेळी दिलेल्‍या पाठिंब्‍यासाठी आभार मानते. मी माझे ऑलिम्पिक २०२० खेळण्‍याचे स्‍वप्‍न सत्‍यात आणण्‍यासाठी त्‍यांचा सातत्‍याने अधिकाधिक पाठिंबा मिळवण्‍यासाठी उत्‍सुक आहे.’  

बॉक्सिंगमध्‍ये भारतासाठी पदके जिंकलेली पिंकी जंगरा म्‍हणाली, ‘मला ‘गर्व है’ उपक्रमाचा भाग असण्‍याचा आनंद  आहे. त्‍यांनी माझी उत्तमप्रकारे काळजी घेतली. अदानी ग्रुपकडून गतकाळात माझ्या प्रशिक्षणासाठी मिळालेल्‍या पाठिंब्‍याने मला खूपच मदत झाली. यामुळे मला माझे गैर-हंगामी प्रशिक्षण शिबिरे, माझी फिजियोथेरपी, पोषण, उपकरण आणि इतर खर्चांमध्‍ये मदत झाली. मला अशा गोष्‍टींवर फोकस करण्‍यासाठी माझी ऊर्जा वाया घालवायला लागली नाही आणि मी माझ्या प्रशिक्षणावर आणि माझी तंत्रे व कौशल्‍ये सुधारण्‍यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकले.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search