Next
‘यूएनएसडब्ल्यू’चा महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Wednesday, April 03, 2019 | 02:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सिडनीतील (ऑस्ट्रेलिया) आघाडीचे संशोधन व शिक्षण विद्यापीठ असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सतर्फे (यूएनएसडब्ल्यू) महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी पीएचडी स्कॉलरशिप प्रोग्राम जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत केलेल्या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून एकत्रितरित्या संशोधनाला चालना देण्यासाठी आणि ज्ञानाची देवाण-घेवाण वाढविण्यासाठी ‘यूएनएसडब्ल्यू’ दर वर्षी महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून निवडक २० गुणवंत विद्यार्थ्यांना पीएचडी स्कॉलरशिप्स प्रदान करणार आहे.

संशोधनामध्ये रूची असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘यूएनएसडब्ल्यू’च्या कॅनबेरा कॅम्पससह सिडनी कॅम्पस येथे डॉक्टरेट प्राप्त करण्यासाठी हा उत्तम मार्ग असणार आहे. याचा मुख्य उद्देश्य महाराष्ट्रातील विद्यापीठांसह भागीदार होऊन सर्वोत्कृष्ट संशोधन संस्कृती निर्माण करणे आणि भारतातील काही विकसनशील आव्हाने एकत्रितरित्या संबोधित करणे हा असणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठातून येणारे अर्ज ‘यूएनएसडब्ल्यू’द्वारे स्विकारले जातील. विद्यार्थ्यांना केवळ दिलेल्या नियमांच्या प्रक्रियेनुसार अर्ज करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची पात्रता, गुण, त्यांचा संशोधनामधील अनुभव आणि शैक्षणिक कामगिरी या सर्व गोष्टींवर ‘यूएनएसडब्ल्यू’द्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले विद्यापीठ व ‘यूएनएसडब्ल्यू’ कॅनबेराच्या उपकुलगुरूंना एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) सादर करणे अपेक्षित आहे. ‘यूएनएसडब्ल्यू कॅनबेरा’द्वारे ‘ईओआय’चे मूल्यांकन करून पात्र अर्जदारांना सूचित केले जाईल. प्रवेश आणि स्कॉलशिपसाठी ‘यूएनएसडब्ल्यू’ला अधिकृत अर्ज करणे गरजेचे आहे.

‘यूएनएसडब्ल्यू’ अर्जदाराचे शैक्षणिक क्षेत्र आणि त्याने केलेले संशोधन कार्य या दोन्हींची पडताळणी करते. या प्रक्रियेमध्ये मूल्यांकन पद्धतीने गुणांचे रूपांतर ‘यूएनएसडब्ल्यू’ मान्य गुणांच्या टक्केवारीत केले जाईल. प्रत्येक अर्जदारासाठी वापरण्यात येणार्‍या मूल्यांकनामध्ये विद्यार्थ्याला पदवी देणार्‍या विद्यापीठाचे जागतिक स्थानदेखील लक्षात घेतले जाणार आहे. अर्जदाराला तीन वर्षीय पदवीसह संशोधन क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या (पूर्वी केलेल्या संशोधनामध्ये संशोधक घटक हे २-३ पेक्षा कमी नसावेत). हे पदव्युत्तर शिक्षण ‘युएनएसडब्ल्यू’मधील संशोधन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासमान असावे. या मूल्यांकनादरम्यान या श्रेणीचे ‘युएनएसडब्ल्यू’ समान गुणांमध्ये रूपांतर केले जाईल.

या विद्यापीठामध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतातील हुशार विद्यार्थ्यांची भर्ती होत असून, अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ‘फ्युचर ऑफ चेंज’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ४५० स्वयंसेवक व व्यावसायिकांना पडताळून पाहणारी, संशोधन क्षेत्रात असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करणारी ‘युएनएसडब्ल्यू’ ही ‘दी युएनएसडब्ल्यू अ‍ॅडव्हांटेज’चे समर्थन करते. याचा विद्यार्थ्यांना केवळ जागतिक दर्जाची पीएचडी प्राप्त करणे हा एकमेव फायदा होणार नसून याद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक समस्यांना सामोरे जात असणार्‍या जगातील अग्रगण्य गुणवंतांसह काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

हा सामंजस्य करार म्हणजे जागतिक पातळीवर अभिनवतेचा मार्ग अवलंबिण्यासाठी उद्योग व शिक्षणादरम्यान सर्व सीमारेषा ओलांडण्यासाठी शिक्षण आणि संशोधनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘यूएनएसडब्ल्यू’सारखे आघाडीचे विद्यापीठ व राज्य सरकाराअंतर्गत असलेल्या विद्यापीठांमध्ये सहकार्य झाल्यामुळे पात्र असलेल्या योग्य विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक पार्श्‍वभूमी काही असो त्यांना एक संधी मिळणार आहे. यामुळे पुढील भविष्यातील संशोधकांची निर्मिती होणार आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट : https://research.unsw.edu.au/key-dates
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search