Next
‘सेफएज्युकेट’चा महिला उद्योजकांसाठी ‘सेफप्रोनर्स’ उपक्रम
प्रेस रिलीज
Friday, March 22, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:मुंबई : सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात विशेष नैपुण्य असणाऱ्या ‘सेफएज्युकेट’ या कंपनीने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफप्रोनर्स’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत कंपनीने व्यवसायविषयक आकांक्षा असणाऱ्या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रातील पाच महिलांची निवड केली आहे. ‘सेफएज्युकेट’ या पाच महिलांना नाममात्र सुरक्षा ठेवीसमोर एक ट्रक किंवा मालवाहक वाहन देणार असून, त्यांना ड्रायव्हिंग कौशल्य आणि आधुनिक अॅप्लिकेशन्सचे प्रशिक्षण देण्याची, व्यवसाय साहाय्य करण्याची आणि नियत लक्ष्यांक साध्य केल्याबद्दल कमिशन देणार आहे.

‘सेफएज्युकेट’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या जैन म्हणाल्या, ‘भारतीय मनुष्यबळास कौशल्य प्रदान करून त्यांची क्षमता वाढवणे हा आमचा नेहमी प्रयत्न असतो. ‘सेफप्रोनर्स’द्वारे ‘स्त्री शक्ती’चा मुद्दा पुढे नेताना आणि या महिला उद्योजकांना सुरुवात करण्यासाठी एक चांगला मंच प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आणि या उद्योगात प्रगती करण्यासाठी ज्या कौशल्याची त्यांना आवश्यकता असेल, ती सर्व मदत आम्ही त्यांना करू. या प्रोग्रामच्या अखेरीस आपले स्वतःचे वाहन मिळाल्याने या महिला आपला व्यवसाय पुढे दीर्घकाळ चालू ठेवू शकतील आणि स्वतंत्र जीवन जगू शकतील.’‘सेफप्रोनर्स’मध्ये निवडलेल्या प्रत्येक महिला चालकाला ‘सेफएज्युकेट’शी संलग्न होण्याची आणि आपली व्यावसायिक लक्ष्ये साध्य करण्याची संधी देण्यात येईल. सहभागीला ड्रायव्हिंगचे उत्तम प्रशिक्षण असले पाहिजे, तिच्याकडे वैध लायसन्स असले पाहिजे आणि ज्या क्षेत्रात त्या ड्रायव्हिंग करणार असतील, त्या भागातील प्रादेशिक भाषा त्यांना येत असली पाहिजे, अशी यातील किमान पात्रता होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 95 Days ago
Good idea . Best wishes.
0
0

Select Language
Share Link
 
Search