Next
‘शांतता, अहिंसेने यश कसे मिळते हे मराठा आंदोलनाने दाखवले’
मराठा आरक्षणाबद्दल ‘राष्ट्रवादी’तर्फे शिंदेंनी केले सरकारचे अभिनंदन
प्रेस रिलीज
Thursday, June 27, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘देशाला वेगळा संदेश देत शांततेच्या, अहिंसेच्या मार्गाने यश कसे मिळते हे मराठा आंदोलनाच्या रूपाने जगाला पाहायला मिळाले. दोन्ही सभागृहातील पक्षांचा व सदस्यांचाही याला एकमुखी पाठिंबा असल्याने तेही या विजयाचे शिल्पकार आहेत,’ अशा शब्दांत मराठा आंदोलकांचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

आज (२७ जून) मराठासमाजाला आरक्षण लागू करण्यात आले. त्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सरकारचे अभिनंदन केले. आंदोलन करताना गुन्हे दाखल झाले तरी न डगमगता सरकार व सदनाच्या भावना एकत्र येऊन हा ऐतिहासिक विजय मिळाला असल्याचे सांगत मुख्यमंत्री, महसुलमंत्री व राज्य मागासवर्ग आयोगाचे आणि सदनाच्या, सर्व पक्षाच्या सदस्यांचे आभार शिंदे यांनी मानले.

दरम्यान, ओबीसीला धक्का न लावता घेतलेला निर्णय असून, आज आनंदाचे वातावरण आहे. फक्त मराठा समाजाच्या तरुणांवर जे गुन्हे दाखल आहेत ते तात्काळ मागे घेण्याची मागणीही आमदार शिंदे यांनी केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search