Next
‘शासनाच्या महसूल वाढीवर भर द्या’
BOI
Friday, July 06, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘राज्य शासनाच्या महसूल वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व महसूल अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी चार जुलै रोजी येथे केले.

डॉ. म्हैसेकर यांनी सोलापूर जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठका घेतल्या. या बैठकांत दोन्ही कार्यालयाच्या दफ्तर तपासणीत आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी संबंधित खाते प्रमुखांकडून माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी महसूल वाढीच्या उद्दिष्टावर भर देण्याचे आवाहन केले. विशेषत: गौण खनिजाच्या स्वामित्व हक्कापोटी मिळणाऱ्या महसुलात वाढ होणे अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यातील वाळू ठेक्याच्या लिलावातून महसूल वाढला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सातबारा संगणकीकरण, शर्तभंग प्रकरणे, संरक्षण मंत्रालयाला द्यावयाच्या जागा, महावितरण कंपनीला दिलेल्या जागा, कोतवाल आणि पोलिस पाटील भरती आदी विषयांची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली. याबाबत जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करून कामाचा निपटारा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, किशोर पवार, प्रमोद गायकवाड, शमा पवार-ढोक, रामचंद्र उगले, प्रवीण साळुंके, तहसीलदार उज्ज्वला सोरटे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत विकासाची कामे गतीने करण्याच्या तसेच ग्रामीण दवाखाने, शाळांच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

दरम्यान, अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या परिसरात डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त प्रताप थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपवनसरंक्षक संजय माळी, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, पोलीस निरीक्षक रवी घोडके आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link