Next
आडवाटेवरची भटकंती
BOI
Friday, June 08, 2018 | 10:51 AM
15 0 0
Share this story

शहरातील सिमेंटच्या जगलांना कंटाळलेल्यांना कायम हिरवा निसर्ग, निसर्गाच्या कुशीत दडलेले सौंदर्य, गडकिल्ले, मंदिरे, लेण्या आणि बरेच काही साद घालत असते. निसर्गाच्या प्रेमातून आणि अनवट वाट धुंडाळण्याच्या उर्मीतून खऱ्या अर्थाने ‘भटक्या’ असणाऱ्या ओंकार वर्तले यांना नवनवीन ठिकाणे साद घालत गेली. त्यातून त्याची भटकंती सुरू झाली आणि या भटकंतीतून आलेल्या अनुभवांतून साकार झाली ‘आडवाटेची भटकंती.’ या भटकंतीमध्ये अनेक ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ देण्यात आले असून, सहजसोप्या लेखनशैलीमुळे ही ‘आडवाटेची भटकंती’ वाचतच राहावे असे वाटते.

डोंगराच्या खिशीतील ‘सर्वतीर्थ टाकेद’पासून सुरू झालेली ही भटकंती थोरल्या बाजीरावाचे जन्मस्थान असणारे नाशिक जिल्ह्यातील दुबेर गावापासून शहाजीराजांचे पेमगिरी, हरिश्चंद्रगड, जुन्नरचे धार्मिक पर्यटन, माथेराननजीकचा विकटगड, राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कुंडलिका व्हॅलीतून, नारायणेश्वराचे मंदिर, कातळधार, आडवाटेवरील शिवालये, गौताळा अभयारण्यातील पाटणादेवीपर्यंत, कोंडेश्वराच्या पठारावरून वासोट्याच्या सुप्रसिद्ध भन्नाट जंगल सफारीपाशी येऊन थांबते. या सर्व अनवट ठिकाणापर्यंत नेमेके कसे जावे ही महत्त्वपूर्ण माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे. या शिवाय उत्तमोत्तम छायाचित्रांची जोड आहेच. त्यामुळे ‘भटक्यां’साठी खऱ्या अर्थाने शिदोरी असणाऱ्या ‘आडवाटेची भटकंती’ अनुभवायलाच हवी.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १५९
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link