Next
‘आयडीबीआय’ रिटेल बँकिंग धोरणाला गती देणार
प्रेस रिलीज
Saturday, June 30, 2018 | 12:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आरबीआय’ने गृहकर्जासंदर्भात जारी केलेल्या पीएसएल नियमांच्या अनुषंगाने आपल्या गृहकर्जाची पुनर्रचना करणारी आयडीबीआय बँक ही पहिली शेड्युल कमर्शियल बँक आहे. बँकेने गृहकर्जाचा स्लॅब विद्यमान ३० लाख रुपयांवरून ३५ लाख रुपयांपर्यंत नेला असून, हा बदल १८ जून २०१८पासून लागू झाला आहे.

आयडीबीआय बँकेने आता ३५ लाख रुपयांच्या कर्जासाठी ८.५ टक्के प्रती वर्ष (सहा महिने एमसीएलआर+०.०५ टक्के) हा नवा व्याजदर देऊ केला आहे. महिला आणि नोकरदार यांच्यासाठी व्यादरात पाच बीपीएस सवलत बँकेने देऊ केली आहे. याशिवाय, कर्जदाराच्या क्रेडिट गुणांकनांच्या आधारावर जास्तीत जास्त १५ बीपीएस सवलतही बँकेने उपलब्ध केली आहे. सहा महिन्यांच्या एमसीएलआरसह सहामाही पुनर्रचनेशी गृहकर्ज जोडण्यात आले आहे.

वाहन आणि वैयक्तिक कर्जांच्या बाबतीत ग्राहकांचा कर्जफेडीचा रेकॉर्ड चांगला असेल, तर आयडीबीआय बँकेकडून जोखीमेवर आधारित आकर्षक व्याजदर देऊ केले आहेत. वाहनकर्जासाठी ८.९० टक्क्यांपासून ९.५० टक्क्यांपर्यंत प्रती वर्षाचा व्याजदर ठेवला आहे. वैयक्तिक कर्जासाठी १२ टक्क्यांपासून १४ टक्क्यांपर्यंत प्रती वर्षाचा व्याजदर आहे. क्रेडिट गुणांकनाच्या आधारे असलेल्या व्याजरानुसार चांगले क्रेडिट गुणांकन असलेल्या ग्राहकांसाठी कमी व्याजदर देऊ केला आहे.

या नव्या सुविधांबाबत आयडीबीआय बँकेच्या रिटेल बँकिंग ग्रुपचे कार्यकारी संचालक जॉर्टी चॅको म्हणाले, ‘गृहकर्जाची रक्कम आणि व्याजदरात केलेल्या पुनर्रचनेचा गृहकर्जाच्या वाढीवर, विशेषत: परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांबाबतीत अनुकूल परिणाम होईल, असा मला विश्वास आहे. वाहन आणि वैयक्तिक कर्जाला क्रेडिट गुणांकनाशी जोडण्याची नवी योजना लागू करून बँकेने कर्जपुरवठ्याचा दर्जा राखतानाच चांगल्या ग्राहकांना योग्य दर देऊ करण्याची बांधिलकी जोपासली आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link