Next
पावस दशक्रोशी ब्राह्मण सेवा संघाचा वार्षिक मेळावा उत्साहात
BOI
Monday, February 04, 2019 | 04:52 PM
15 0 0
Share this article:

वेदमूर्ती नामजोशी गुरुजींचा सत्कार

पावस :
पावस दशक्रोशी ब्राह्मण सेवा संघातर्फे तीन फेब्रुवारी २०१९ रोजी वार्षिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. पवमान, पंचसूक्त अभिषेक, श्रीराम पूजा, आरती असे धार्मिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा गौरव, मार्गदर्शन आणि चक्री कीर्तन आदी कार्यक्रमांचा त्यात समावेश होता. 

पावस (ता. जि. रत्नागिरी) येथील आबा चिपळूणकर यांच्या श्रीराम मंदिरात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. श्रीराम फडके, वेदमूर्ती फडके, प्रा. माधव पालकर, डॉ. साधना गोगटे, दादा देशमुख, मोहनबुवा कुबेर, श्री. अडके आणि सचिव जयंत फडके उपस्थित होते.

डॉ. गजानन रानडे यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेचा १४ वर्षांचा प्रवास मांडला. ‘संघामुळे दहा गावांतील ब्राह्मण ज्ञातिबांधवांची घरे जोडली गेली. कोणतेही पद नसताना कार्यकर्ते मेहनत घेतात. नोकरीनिमित्त बाहेर असणारी माणसे पुन्हा गावी येऊन या कार्यात हातभार लावत आहेत. आता तरुण व शाळेतील मुलेसुद्धा येत असल्याने हा संघ चिरकाल कार्यरत राहील,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

या वेळी जनूभटजी फडके स्मृती याज्ञिकी पुरस्कार वेदमूर्ती चंद्रकांत नामजोशी यांना प्रदान करण्यात आला. ‘मी अनेक वर्षे मुंबईत होतो. गावी आलो, तेव्हा ब्राह्मणांचे एकत्रीकरण पाहिले. जनूभटजींच्या कार्यामुळे त्यांचे शिष्य चांगल्या प्रकारे पौरोहित्य करत आहेत. त्यांच्या नावाचा पुरस्कार खूपच मोठा आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (जनूभटजी फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या शिष्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिराच्या स्थानिक समितीचे नूतन अध्यक्ष माधव पालकर यांनाही या वेळी गौरवण्यात आले. ‘चांगल्या कामाची नोंद नक्की घेतली जाते,’ असे ते म्हणाले. ‘आपल्यातील सामर्थ्य ओळखा. ज्ञातीबांधवांनी योगदान द्यावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. 

ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊ करंदीकर, सेंद्रिय शेती व गोपालन गट प्रवर्तक धनंजय जोशी, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार मकरंद पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम गोडबोले, राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या पूजा कात्रे, एलएलबी झाल्याबद्दल अविनाश काळे, वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल जयंत फडके यांनाही या वेळी गौरवण्यात आले. 

गुणवंत विद्यार्थी तेजस फडके, ओंकार बापट, अंकिता बापट, ओम जोशी, वल्लभ जोशी, प्राजक्ता जोशी, तनुजा फाटक, नीळकंठ बेहेरे, विहंग फडके, वरदा पटवर्धन, केदार साठे, विनय साठे, प्रथमेश मराठे, सागर दाते, राहुल गोडबोले, रोहन गोडबोले, आकांक्षा करंदीकर, पूजा गोगटे, आदित्य भट यांना वेळी बक्षिसे देण्यात आली.

सायंकाळी युवा कीर्तनकार स्पृहा चक्रदेव यांचे कीर्तन, हळदीकुंकू समारंभ झाला. तसेच रात्री नागपूर येथील मोहनबुवा कुबेर आणि सहकाऱ्यांचे चक्रीकीर्तन रंगले.

‘अनिरुद्ध उपासना ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद’
अनिरुद्ध उपासना ट्रस्टचे प्रा. वैभव कानिटकर यांनी अनिरुद्ध बापूंच्या कार्याची माहिती दिली आणि त्यांचे सामाजिक कार्य, तसेच सामूहिक उपासनेचे महत्त्व सांगितले. ‘रत्नागिरी शहरातील टीआरपी येथील ‘अतुलित बलधाम’ येथे आता त्रिविक्रम मठ स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे प्रेरणादायी क्लब सुरू होणार आहे. ट्रस्टतर्फे आपत्ती व्यवस्थापन, रामनाम बँक सुरू करण्यात आली आहे. पावस येथे मागणीनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

मेळाव्यानिमित्त घेण्यात आतलेल्या स्पर्धांचा निकाल (विजेता व उपविजेता या क्रमाने) : 

बुद्धिबळ - छोटा गट - अद्वैत काळे, श्रेयस दाते, मोठा गट - तेजस लेले, हेमंत चक्रदेव 
कॅरम - छोटा गट- ओंकार जोशी, विनायक करंदीकर, मोठा गट - योगेश फडके, केदार पटवर्धन, 
निबंधलेखन - छोटा गट - गंधार पाटणकर, आदित्य भट, 
मोठा गट - मृदुला जोशी, अविनाश काळे, माधुरी लेले, 
वक्तृत्व स्पर्धा - छोटा गट - गंधार पाटणकर, अद्वैत काळे
आठवी ते दहावी - ओंकार जोशी
खुला गट - यश केळकर, मेघना बेहेरे, भूषण जोशी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
गजानन(अरूण)बेहेरे About 254 Days ago
मेळावा ऊत्तम झाला,मी व्यक्तिश: सबंध दिवस ऊपस्थित होतो. वार्ताकंन सुंदर,आटोपशिर केले आहे.धन्यवाद.
3
0

Select Language
Share Link
 
Search