Next
‘केपीआयटी स्पार्कल’मध्ये भविष्यातील तंत्रज्ञान प्रारूपे
प्रेस रिलीज
Monday, February 19, 2018 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

‘केपीआयटी स्पार्कल २०१८’ स्पर्धेत आयआयटी खरगपूरच्या ‘टीम इलेक्ट्रोड्स’ने प्लॅटिनम पुरस्कार पटकावला.
पुणे : केपीआयटी टेक्नोलॉजीजतर्फे आयोजित ‘केपीआयटी स्पार्कल २०१८’ या स्पर्धेच्या विजेत्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी उर्जा, दळवळण क्षेत्रासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, नवी साधने (मटेरिअल) आणि सायबरसिक्युरिटीची वापर करून हरित, सुरक्षित आणि वापरकर्त्यासाठी सुलभ असलेली उत्पादने विकसित करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले होते.  
  
सांडपाण्यातील जीवाणूंपासून डिस्पोजेबल बॅटरी विकसित करण्याबद्दल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, खरगपूरच्या ‘टीम इलेक्ट्रोड्स’ने प्लॅटिनम पुरस्कारावर नाव कोरले. त्यांना दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
 
मंगलोर येथील सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या टीम ‘स्मार्टगिअर’ला स्मार्ट हेल्मेट विकसित करण्याबद्दल सुवर्ण पारितोषिक मिळाले. अपघात झाल्यास अपघाताच्या ठिकाणासह त्या घटनेबद्दलचा अलर्ट अॅपमध्ये सेव्ह केलेल्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्टला देण्यात येतो. या टीमला पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले.

 नव्या साधनाचा वापर करून तेलमिश्रण झालेल्या पाण्याला पिण्यायोग्य करेपर्यंत गाळण्याच्या योग्यतेची उपाययोजना विकसित केल्याबद्दल पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयतील टीम नॅनोनॉक्सला रजत पुरस्कार मिळाला. 

स्वयंपाकघरातील किचन स्टोव्हमधून निर्माण होणारी उर्जा थर्मोइलेक्ट्रिक मोड्यूल्सचा (टीईजी) वापर करून विजेमध्ये परिवर्तीत करणारी उपाययोजना विकसित केल्याबद्दल डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील टीम थर्मो आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांची टीम यांनाही रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संघांना प्रत्येकी दोन लाख ५० हजार रुपयांचे  रोख पारितोषिक देण्यात आले.
 
प्रवास आखणे आणि अपघात प्रतिबंधक स्वयंअध्ययन यंत्रणा विकसित केल्याबद्दल हमीरपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांच्या टीम ’पाथ प्रेडिक्टर’ला सर्वाधिक लोकप्रियतेचा पुरस्कार मिळाला. देशभरातून मिळालेल्या मतांच्या आधारे त्यांची या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. त्यांना एक  लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

उत्पादन अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जागतिक दर्जाच्या टेक्नॉलॉजी कंपनी केपीआयटीतर्फे आयोजित या स्पर्धेसाठी केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नॉलेज पार्टनर होता. 

या स्पर्धेच्या पात्रतापूर्व फेरीत भारतभरातील सहाशे अभियांत्रिकी आणि विज्ञान महाविद्यालयांतून बारा हजारहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. यात आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) आणि एनआयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) यासारख्या २८ शैक्षणिक संस्थांममधील विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. नावीन्यता, वाजवी खर्च आणि व्यवहार्यतेच्या निकषांवर तीस संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली.

या स्पर्धेचे अॅकेडमिक पार्टनर असलेले पुण्यातील आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पीसीसीओई) यांच्यातर्फे १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनात अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांनी त्यांचे प्रकल्प सादर केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित तज्ज्ञ, तंत्रज्ञान चिकित्सक, विद्वान आणि अग्रणी उद्योजक यांनी या प्रकल्पांचे परीक्षण केले.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन आणि राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाचे (एनएसटीईडीबी) सदस्य सचिव हरकेश मित्तल यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या वेळी केपीआयटीचे सहसंस्थापक, अध्यक्ष आणि समूह सीईओ रवी पंडित म्हणाले, ‘स्पार्कलमध्ये दर वर्षी कल्पकता आणि नवशोधांच्या बाबतीत नवनवे मापदंड कायम करण्यात येत आहेत. उर्जा आणि दळणवळण क्षेत्रात स्पर्धकांकडून मिळणाऱ्या संकल्पनांमध्ये या क्षेत्रांत देशात परिवर्तन घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणस्नेही, हरित व इंटेलिजंट तंत्रज्ञान असलेली स्मार्ट शहरे विकसित करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे’. 

‘केपीआयटी स्पार्कल २०१८’ हा कंपनीच्या इनोव्हेशन कौन्सिलचा उपक्रम आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर या कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. स्पार्कलच्या माध्यमातून आम्ही उदयोन्मुख संशोधकांना त्यांच्या कल्पना उत्पादनांमध्ये परीवर्तीत करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर्स उपलब्ध करून देऊ.त्याचप्रमाणे काही आश्वासक कल्पनांना विकसित करण्याचा विचार केपीआयटीतर्फेही करण्यात येईल’, असेही त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search