Next
‘‘प्रेमा तुझा रंग कसा’मुळे प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी’
BOI
Friday, September 21, 2018 | 12:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हा कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी आहे, अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन ते करत आहेत. 

ते पुढे म्हणाले, ‘या कार्यक्रमाचा मुळ उद्देश समाजात जागरुकता वाढवणे हा आहे. समाजात घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो; पण त्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि अशा गोष्टींपासून सावध राहण्याचे आवाहन ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. याद्वारे कोणत्याही गुन्ह्याचे,वाईट प्रवृत्तीचे समर्थन केले जात नाही. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी खास आहे. समाजामध्ये चांगला विचार रुजवण्याचा स्टार प्रवाह वाहिनी प्रयत्न करतेय. त्यांच्या या प्रवासात मला सामील होता आले, याचा आनंदही आहे.

अनेक वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर येण्याचा अनुभव कसा आहे, असे विचारले असता, अजिंक्य देव म्हणाले, ‘हिंदी टेलिव्हिजनवर माझी नुकतीच एक सीरिज येऊन गेली; पण मराठी टेलिव्हिजनवर मी खूप दिवसांनंतर दिसणार आहे. मुळात एखादा शो मनापासून आवडला तरच मी तो स्वीकारतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चं वेगळेपण मला भावले. याआधी ‘स्टार प्रवाह’च्याच ‘स्वप्नांच्या पलिकडले’मध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीसोबत असणारे नाते या कार्यक्रमाच्यानिमित्ताने आणखी घट्ट झाले आहे,याचा विशेष आनंद आहे.

‘प्रेमा तुझा रंग कसा’या कार्यक्रमाचे वेगळेपण काय आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, ‘सध्या मराठीमध्ये अशा प्रकारचा एकही कार्यक्रम नाही. प्रत्येक दिवशी नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रत्येक भागात नवी गोष्ट आणि नवे कलाकार असल्यामुळेच प्रेक्षकांना सिनेमा पाहात असल्याचा अनुभव येईल. समाजात ज्या घटना घडतात त्याचेच प्रतिबिंब या कार्यक्रमामधून दाखवण्यात येत आहे. माझ्यासाठी हा अनुभव समृद्ध करणारा आहे. मला महाराष्ट्रभरातून अभिनंदन करणारे बरेच फोन आले. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चे भाग मित्रमंडळी आणि प्रेक्षकांना आवडत असल्याच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link