Next
आशा भोसले यांची ‘मिसेस बीज’ कपकेक शॉपीला भेट
प्रेस रिलीज
Friday, July 26, 2019 | 04:16 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांनी पुण्यातील ‘मिसेस बीज’ या कपकेक शॉपीला भेट दिली. देशोदेशीची खाद्यसंस्कृती आणि पाककौशल्यात रुची घेणाऱ्या आशा भोसले यांना कपकेकचे वैविध्य आणि माधुर्य आवडले. त्यांनी वेगवेगळ्या कपकेक्सचा आस्वाद घेतला आणि काही सोबतही घेतले. 

एरंडवणे येथील मंगेशकर हॉस्पिटल रस्त्यावरील ‘मिसेस बीज’ ही कप केकशॉपी भारती मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांनी सुरू केली असून, सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी त्याचे उद्घाटन केले होते. नुकत्याच पुण्यात आलेल्या आशा भोसले यांनी या कपकेक शॉपीला भेट दिली आणि येथे उपलब्ध विविध आकर्षक चवीच्या कपकेक, टी केक्स, पेस्ट्रीज, सेलिब्रेशन केक, कुकीज, फ्रेश ब्रेड आणि सँडविचेस या प्रकारांची माहिती घेतली. निर्मितीप्रक्रिया, लागणारे घटक यांचीही माहिती घेतली. तेथील कर्मचाऱ्यांशी परिचय करून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. भारती मंगेशकर यांनी स्वागत केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search