Next
पुण्यात साकारणार जगातील सर्वांत मोठे तैलचित्र...
BOI
Saturday, October 20 | 01:45 PM
15 0 0
Share this story

संदीप सिन्हापुणे : मिनिएचर पेंटिंग्जनी जगाला मोहवणारे, ख्यातनाम अमूर्त चित्रकार संदीप सिन्हा यांनी तब्बल ५०० चौरस फूट आकाराच्या एकदृश्य चित्राची निर्मिती केली आहे. इतक्या मोठ्या आकाराच्या एकदृश्य व्यावसायिक तैलचित्राचा जागतिक विक्रम संदीप सिन्हा यांच्या नावावर नोंदला जाणार आहे. येत्या २५ व २६ ऑक्टोबरला राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अवधान – अवेकनिंग द गॉडेस विदीन’ या त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनात हे भव्य तैलचित्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्राच्या माध्यमातून संदीप हे पूर्वीचा जागतिक विक्रम मोडणार आहेत. त्यांनी हे चित्र ॲसिड हल्ल्यांतून वाचलेल्या महिलांना समर्पित केले आहे.

हे तैलचित्र ५०० चौरस फुटांहून अधिक आकाराचे असून, ते निर्माण करण्यासाठी संदीप यांना अडीच महिने लागले. जागतिक विक्रमाच्या नियमानुसार सादर करावयाचे चित्र हे एकदृश्य (सिंगल सीन) असावे लागते. संदीप यांनी या कलाकृतीची संकल्पना म्हणून हिमालयाच्या पर्वतरांगा निवडल्या असून, त्यातून निसर्गाची प्रतिकात्मकता व भव्यता पोचवण्याचा हेतू बाळगला आहे. हिमालय पर्वत हा सर्व आव्हानांना तोंड देऊन भक्कम उभा आहे आणि ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलाही त्याच निर्धाराचे प्रतिक आहेत, अशी या चित्रामागची संकल्पना आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन निष्णात चित्रकार आणि किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांच्या हस्ते होणार आहे. वंचित बालकांसाठी कलेद्वारे शिक्षण देण्याच्या हेतूने त्यांनी ‘केअरिंग विथ कलर’ हा उपक्रम सुरू केला आहे.  

टेकमहिंद्र कंपनीत माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेले संदीप सिन्हा म्हणाले, ‘एक कलाकार असणे म्हणजे केवळ आकांक्षा, सर्जनशीलता व अमर्याद कल्पना इतकाच अर्थ नसून, प्रत्येकवेळी अधिकाधिक उत्तम देण्यासाठी स्वतःलाच आव्हान द्यावे लागते. तुम्हाला तुमची विचार प्रक्रिया खरोखर कॅनव्हासमध्ये आविष्कृत करावी लागते आणि जीवनातील वास्तवाचा शोधही घ्यावा लागतो.’

विशाल तैलचित्राची कल्पना कशी सुचली हे स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘मी संरक्षण दलाची पार्श्वभूमी असलेल्या वातावरणात जन्मलो आणि वाढलो. मला प्रत्येकवेळी आपल्या समाजासाठी व देशासाठी अभिमानास्पद असे काही आगळे करण्याच्या विचाराची प्रेरणा मिळत गेली. काळाने माझ्यातील कलाकार जसजसा फुलत गेला तसे मी समाजाला प्रभावी संदेश देणारी चित्रे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत गेलो.’

अमूर्त चित्रकलेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘मी अमूर्त चित्रकला प्रकार निवडला नसून, या प्रकारानेच मला निवडले. मला अमूर्त कला खूप आवडते, कारण तिचा माझ्या ध्यानधारणेशी सखोल संबंध आहे. हा कलाप्रकार माझ्या सातत्यपूर्ण विचार प्रक्रियेला मूर्त रूप देतो. हा कलाप्रकार एक माणूस म्हणून पूर्णत्व मिळवून देतो, असे मला ठामपणे वाटते.’

याआधी २०१५ मध्ये संदीप सिन्हा यांनी ‘लाईफ अँड ग्लोबल वॉर्मिंग’ संकल्पनेवर आधारित प्रत्येकी एक  सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटर आकाराच्या ९४५ मिनिएचर पेंटिंग्जचा समावेश असलेली एक कलाकृती साकारली होती. ही चित्रे १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या एकाच कॅन्व्हासवर रंगवण्यात आली होती. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link