Next
मंत्रालयात शहिदांना श्रद्धाजंली
प्रेस रिलीज
Saturday, February 16, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान शहीद झाले. या शहिदांना १५ फेब्रुवारी २०१९ मंत्रालयात महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.

या वेळी आमदार हरिभाऊ राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, मुख्य सचिव कार्यालयाचे सह सचिव राजीव निवतकर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते, महसूल विभागाचे उपसचिव किरण वडते आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search