Next
अरुण काकतकर यांच्या हस्ते काव्य सप्ताहाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, December 27, 2018 | 05:37 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कविताप्रेमींचा वार्षिक आनंदोत्सव असलेल्या ‘काव्य सप्ताह २०१८’चे उद्घाटन दूरदर्शनचे ज्येष्ठ निर्माते अरुण काकतकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे हे १९ वे वर्ष असून, यानिमित्त आयोजित काव्य संमेलनात ५० कवी सहभागी झाले होते.  

२५ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत हा सप्ताह चालणार असून, सदाशिव पेठेतील स्काउट सभागृहात याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ डिसेंबरला सायंकाळी सात वाजता काव्य सप्ताहचे उद्घाटन झाले. रमेश गोविंद वैद्य यांनी या सप्ताहाचे संयोजक केले आहे. पहिल्या दिवशी आयोजित कवी संमेलनात अरुण काकतकर, रमेश वैद्य, आश्लेषा महाजन, आरुषी दाते, सुधीर कुबळे, बाळासाहेब कार्वे यांच्यासह ५० कवींनी कविता सादर केल्या. दिव्यचक्षु कवींनी ब्रेल लिपीतील कविता सादर केल्या.



ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य राजेंद्र देशपांडे, राजा नाईक, सुरेंद्र गोखले, दीपक बीडकर यांनी स्वागत केले. आयोजक  जेष्ठ कवी रमेश वैद्य यांनी प्रास्ताविक केले. दीपाली दातार यांनी सूत्रसंचालन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search