Next
‘सीए फाउंडेशन डे’निमित्त २८ जूनला विविध कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, June 27, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सनदी लेखापाल स्थापना दिवसानिमित्त (सीए फाउंडेशन डे) दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जून २०१९ रोजी बिबवेवाडीतील ‘आयसीएआय’ भवन येथे गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम होणार आहे. सीए दिलीप सातभाई आणि सीए मंदार बागुल हे या कार्यक्रमात गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

त्याच प्रमाणे ‘आयसीएआय’तर्फे स्वछ भारत अभियानअंतर्गत शहरातील वर्दळीच्या भागात स्वच्छता करण्यात आली. रात्र मॅरेथॉन, करिअर मार्गदर्शन आणि जीएसटीवर आर्थिक साक्षरता कार्यक्रम, वृक्षारोपण, आरोग्य विषयावरील व्याख्याने, ११ ठिकाणी रक्तदान शिबिर आणि अवयवदानाबद्दल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सामाजिक उपक्रमासोबतच विविध क्रीडा स्पर्धांही घेतल्या जाणार आहेत. 

‘‘आयसीएआय’तर्फे आयोजित केलेले हे सर्व कार्यक्रम मोफत असून, अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे; तसेच सभासदांनीही याचा लाभ घ्यावा. उपक्रमात सहभागी होण्यासाठी संकेत स्थळावरवर नावनोंदणी करावी,’ असे आवाहन ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे यांनी केले आहे.

नाव नोंदणीसाठी : puneicai.org 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search