Next
स्नेहसंमेलनात शिक्षकांचा गौरव
राजा भगीरथ शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा ओंजळ कार्यक्रम उत्साहात
नागेश शिंदे
Friday, September 07 | 05:47 PM
15 0 0
Share this storyहिमायतनगर :
शहरातील राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला ‘ओंजळ’ हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. त्यात शिक्षकांचा गौरव करण्यात आला.राजा भगीरथ विद्यालयाच्या २००१च्या विद्यार्थ्यांच्या बॅचने पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने १३ शिक्षकांचा गौरव सोहळा व स्नेहसंमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक अनगूलवार होते. या अविस्मरणीय सोहळ्याला मुख्याध्यापकांसह जी. डी. कापसे, बी. आर. पवार, डी. एल. कोंडामंगल, के. आर. दिक्कतवार, प्रा. सुरेश जाधव, के. बी. शेनेवाड, श्रीमती तगडपल्लेवार, एस. टी. उत्तरवार, कै. एन. वाय. पाईकराव (मरणोत्तर), जी. एम. मुठ्ठेवार, श्रीमती पी. जी. कांबळे, वाय. एन. गवंडी आदी शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण करेवाड सिरंजनीकर यांनी केले. ‘शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पुस्तकांतून नव्हे, तर हृदयातून शिकवले. आम्ही घडलो तुमच्यामुळे. आमचा पाया प्राथमिक शिक्षणातून मजबूत झाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही आपले ऋणी आहोत,’ अशी कृतज्ञता डॉ. किरण करेवाड यांनी व्यक्त केली. या वेळी शिक्षक, माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आदींसह शाळेतील विद्यार्थी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link