Next
आयझॅक अॅझिमॉव्ह
BOI
Tuesday, January 02 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘जे कर्तृत्वहीन असतात, ज्यांना काहीही विधायक करता येत नाही, अशीच लोकं हिंसेचा सहारा घेतात’ असं म्हणणारा अत्यंत बहुप्रसवा विज्ञानलेखक आयझॅक अॅझिमॉव्ह याचा दोन जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याच्याविषयी...
........
दोन जानेवारी १९२० रोजी रशियात पेत्रोव्हिच येथे जन्मलेला आयझॅक अॅझिमॉव्ह वाढला तो मात्र अमेरिकन नागरिक म्हणून! विज्ञानकथेच्या क्षेत्रातला दादा माणूस म्हणून अॅझिमॉव्ह ओळखला जातो. जवळपास पाचशे पुस्तकं अशी अचंबित करणारी कामगिरी त्याच्या नावावर आहे. 

सामान्य माणसांना कळेल अशा सोप्या भाषेत विज्ञान पोहोचवण्याचं काम त्याने आपल्या लेखनातून केलं. त्याचबरोबर विज्ञानाच्या कक्षा रुंदावत माणूस कुठपर्यंत भरारी घेऊ शकेल, अशा शक्यता मांडणाऱ्या आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विज्ञानकथा त्याने लिहिल्या. काहींच्या मते त्याची १९४१ सालची ‘नाइटफॉल’ ही लघुकथा विज्ञानकथांमधली सर्वोत्कृष्ट लघुकथा मानली जाते. 

सुरुवातीला काही विज्ञानविषयक मासिकांतून लेख लिहिल्यावर १९५० साली त्याची ‘पेबल इन दी स्काय’ ही पहिली विज्ञान कादंबरी प्रसिद्ध झाली. पाठोपाठच त्याची ‘फाउंडेशन’, ‘फाउंडेशन अँड एम्पायर’ आणि ‘सेकंड फाउंडेशन’ अशी अंतराळातल्या एका साम्राज्याची कथा सांगणारी कादंबरी-त्रयी प्रसिद्ध झाली आणि तुफान गाजली. 

विज्ञानाशी परिचय नसणाऱ्यांनासुद्धा त्याने विज्ञान सोपं करून सांगितलं, तेही काही वेळा नर्मविनोदाची फोडणी देत! त्याच्या लेखनासाठी त्याला ह्युगो आणि नेब्युलासारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार अनेक वेळा मिळाले.

आय रोबॉट, दी केव्ह्ज ऑफ स्टील, दी नेकेड सन, दी रोबॉट्स ऑफ डॉन, दी गॉड्स देमसेल्व्ज, दी एंड ऑफ इटर्निटी, रोबॉट ड्रीम्स, दी बायसेन्टेनिअल, लकी स्टार अँड दी ओशन ऑफ व्हीनस, लकी स्टार अँड दी बिग सन ऑफ मर्क्युरी अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.  

सहा एप्रिल १९९२ रोजी ब्रुकलीनमध्ये त्याचा मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link