Next
सोन्याच्या शोधात
BOI
Friday, May 25 | 10:10 AM
15 0 0
Share this story

सोन्याचे आकर्षण केवळ भारतीयांनाच नाही, तर जगभरातील लोकांना असते, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. म्हणूनच ‘गोल्ड रश’ हा चित्रपटांचाही विषय बनला आहे. अनिल चक्रदेव यांनी जगभरात सोन्यासाठी होणारी झुंबड हा नाविन्यपूर्ण आणि आकर्षण विषय पुस्तकाच्या लेखनासाठी निवडला आहे. त्यासाठी त्यांनी पूर्व इतिहासाचाही अभ्यास केला आहे. माणसाला सोन्याचे एवढे आकर्षण का असावे, याचा शोध घेत त्यांनी विषयप्रवेश केला आहे.

नॉर्थ कॅरोलिना, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारतातील सोन्याच्या किंमती कशा ठरतात, मागणी व पुरवठा, सोन्याचा तारण म्हणून उपयोग, सोन्यातील गुंतवणूक, सोनारकला या मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. सोन्याबरोबर चांदीचाही विचार केला असून, सुभाषितांमधील सोने हे वेगळे प्रकरणही जोडले आहे.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १३६
किंमत : १६० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link