Next
फंडटॉनिक स्टार्टअप मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, November 28 | 06:45 PM
15 0 0
Share this story

बिझनेस वर्ल्ड आणि एक्सेंज४मिडियाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक अनुराग बात्रा, वीणा इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र अगरवाल स्त्राता एन्व्हिरोचे संस्थापक अमोल चाफेकर यांना पुरस्कार देताना.
 पुणे : ‘फंडटॉनिक’ या ७०० हून अधिक गुंतवणूकदारांचे नेटवर्क असलेल्या कंपनीतर्फे नुकतेच ‘पुणे स्टार्टअप मॅरेथॉन २०१७’ चे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५० स्टार्टअप, १०० मार्गदर्शक – गुंतवणूकदारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.या वेळी पुणेस्थित दोन स्टार्टअपची निवड करण्यात आली. त्यामध्ये अमोल चाफेकर यांच्या ‘स्त्राता एन्व्हिरो’ या घराबाहेरील हवा प्रदूषण नियंत्रकाची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा आणि नवीन गोयल यांच्या ‘रिपेअर इझी’ या गॅजेट्स बसवायला मदत करणाऱ्या अॅपचा समावेश आहे.

या कार्यक्रमात ५ एफवर्ल्ड.कॉमचे संस्थापक आणि नॅसकॉम फाउंडेशनचे माजी अध्यक्ष डॉ.गणेश नटराजन हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. बिझनेस वर्ल्ड आणि एक्स्चेंज फॉर मिडियाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक अनुराग बात्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वीणा इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र अगरवाल, कँटफिट एक्स-स्पेशल फोर्सेस (इंडिअन आर्मी) आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डचे संस्थापक निवृत्त लेफ्टनंट कर्नल राकेश कृष्णन, एसआयडीबीआय/वर्ल्ड बँकेचे मुख्य सल्लागार संजीब झा, अॅटम टेक्नोलॉजी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अमरेंद्र साहू, येस बँकेचे वरिष्ठ अधिकारी अजय देसाई, फंडटॉनिकचे सहसंस्थापक आणि ग्लोब टेक्स्टाईल इंडिया लिमीटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावीन पारिख, सनबर्स्त हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुजाता मलिक, ऑटोलाईन इंडस्ट्रीजचे सहसंस्थापक एम.राधाकृष्णन, बिलडेस्कचे हेड बिझनेस संतनू समान्ता, फंडटॉनिकचे सहसंस्थापक अक्षित गुप्ता, वायजीइएन कॅपिटलचे संस्थापक जिग्नेश जैन, स्केलमाईंडसचे संस्थापक नैनेश कपाडिया आदी मान्यवर या वेळी  उपस्थित होते. 

‘लीन अॅग्री’चे संस्थापक सिद्धार्थ दियलानी यांच्यासह स्केलमाईंडसचे संस्थापक नैनेश कपाडिया व ‘स्त्राता एन्व्हिरो’चे अमोल चाफेकरनैनेश कपाडिया यांनी स्थापन केलेली स्केलमाईंडस अॅक्सिलरेटर कंपनी फंडटॉनिक बरोबर विविध स्टार्टअपना जोडण्याच्या कामात कार्यरत आहे. या वेळी गटचर्चा, गुंतवणूक कार्यक्रम, कार्यशाळा घेण्यात आली. विविध क्षेत्रातील स्टार्टअपना पुरस्कार वितरणही करण्यात आले. यात भावनिक ताणतणावाशी सामना करायला मदत करणारी अरिंदम सेन यांनी स्थापन केलेली ‘झ्येगो’ ही (आरोग्यसेवा) हेल्पलाईन सेवा, शेतीशी सबंधित कोणतीही गोष्ट खरेदी, विक्री आणि भाड्याने मिळवून देण्याचे  काम करणारी अनिल लाडे यांनी स्थापन केलेले  मार्केटयार्ड (ई-कॉमर्स) हे मोबाईल अॅप्लिकेशन, ऑनलाईन जीसटी ई-फिलिंग सोपे करण्यासाठी राकेश दुबे यांनी स्थापन केलेले ‘टॅक्सजेनी’ हे तंत्रज्ञान व्यासपीठ, अमोल चाफेकर यांनी स्थापन केलेले घराबाहेरील हवा प्रदूषण नियंत्रकाची निर्मिती आणि बसवून देण्याचे काम करणारी स्त्राता एन्व्हिरो संस्था आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून अधिक पिक आणि उत्पन्न मिळवून देण्यात मदत करणारी सिद्धार्थ दियलानी यांनी स्थापन केलेली ‘लीन अॅग्री’ ही  अॅग्री टेक कंपनी यांचा समावेश आहे. 

 अनुराग बात्रा,  शैलेंद्र अगरवाल  'झ्येगो'  हेल्पलाईन सेवेच्या अरिंदम सेन यांना पुरस्कार देताना.या वेळी फंडटॉनिकचे संस्थापक अक्षित गुप्ता म्हणाले, ‘नुकतेच बाणेर मध्ये आम्ही आमच्या कामाचा पसारा १५ हजार चौरस फुट जागेत वाढविला आहे. त्याबरोबर पुण्यातील स्टार्टअप मध्ये गुंतवणूक, त्यांना मार्गदर्शन करण्याचे  काम आम्ही हाती घेतले आहे. आमच्या अद्ययावत कार्यक्षेत्राच्या जागेत स्टार्टअपना केवळ कामासाठी सगळ्या सोयी सुविधा असलेली जागाच उपलब्ध होते असे नाही तर वेळोवेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनही लाभते. असे विविध प्रकारचे उपक्रम सादर करून पुण्यातील स्टार्टअपना उद्योगक्षेत्रातील चालू घडामोडींची माहिती मिळेल, नवनवीन कल्पनांचे आदानप्रदान होईल आणि स्टार्टअपना त्यांचा व्यवसाय वाढविण्याची संधी मिळेल अशी आशा आम्हाला वाटते. यावर्षी आम्हाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता पुढच्या ६ महिन्यात ४० हजार  चौरस फुटापर्यंत वाढविण्याचा आमचा विचार आहे.’

नैनेश कपाडिया म्हणाले, ‘यावर्षी पुण्यातील स्टार्टअपसाठी आम्ही विशेषकरून उपक्रम राबविले. आसियान देश, युरोप आणि इतर देशांबरोबर पुणे स्टार्टअपचे आदानप्रदान उपक्रम राबविले. निवड केलेल्या स्टार्टअपच्या आधारे चालना देणाऱ्या कार्यक्रमासाठी आम्ही आणखी काही अर्ज मागवू. यंदा देशभरातील २० स्टार्टअपना निधी पुरविण्याचे  आमचे  उद्दिष्ट आहे. त्यामध्ये येत्या ६ महिन्यात पुण्यातील किमान ५ स्टार्टअपमध्ये आम्ही गुंतवणूक करू’.

 या वेळी ‘स्त्राता एन्व्हिरो’चे संस्थापक अमोल चाफेकर म्हणाले, ‘तुम्ही जेव्हा जिम मध्ये व्यायाम करून थकलेले असता आणि तुमचा जिम मार्गदर्शक तुम्हाला अजून १ सेट करायलाच लावतो, तुम्ही करू शकता हा विश्वास देतो, प्रोत्साहन देतो तेच प्रोत्साहन आम्हाला स्केलमाईंडसमुळे मिळाले. तुम्ही कमालीचे व्यस्त असता, सगळ्या आघाड्यांवर लढत असता तेव्हा केवळ आर्थिकबाबतीच नव्हे, पण एकूणच व्यवसायवाढीसाठी मदत, पाठिंबा मिळतो तेव्हा खूप दिलासा मिळतो. आम्हाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल आम्ही स्केलमाईंडसचे ऋणी आहोत’.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link