Next
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारणार ‘भाषाबन’
जगातील ६००० भाषांचे प्रतिनिधित्व करणार
BOI
Thursday, September 27 | 04:46 PM
15 0 0
Share this story

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जागतिक भाषांचे प्रतिनिधित्व करणारे भाषाबन साकारणार आहे. २८ सप्टेंबर २०१८ रोजी ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यविषयक परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांतील साहित्यिकांचे विद्यापीठात स्वागत केले जाणार आहे. या साहित्यिकांच्या औपचारिक स्वागतासहितच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जगातील सुमारे सहा हजार भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘भाषाबना’ची निर्मिती आमंत्रित साहित्यिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

८० देशांमधील सुमारे १८० साहित्यिक या प्रतिष्ठित परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. ‘या भाषाबनातील रोपे साहित्यिकांच्या हस्ते लावण्यात येतील. जागतिक पातळीवरील भाषा समृद्धीचे प्रतिनिधित्व हे भाषाबन करील,’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी दिली. 

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, तसेच ‘पेन इंटरनॅशनल’चे संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर व अध्यक्ष जेनिफर क्लेमंट, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. पेन इंटरनॅशनल काँग्रेसची ही भारतामधील पहिलीच परिषद आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या परिषदेचे ‘इंटलेक्चुअल पार्टनर’ आहे.

(‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’च्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link