Next
भारतीय विद्यार्थ्यांसाठी ‘सेफएज्युकेट’तर्फे शिष्यवृत्ती
प्रेस रिलीज
Tuesday, November 20, 2018 | 06:04 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘सेफएज्युकेट’ या सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि सल्लागार कंपनीने या क्षेत्रात कारकीर्द करण्याची इच्छा असणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. 

कंपनीतर्फे चालवण्यात येणाऱ्या सहा महीने मुदतीच्या ‘अॅडव्हान्स डिप्लोमा इन लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती तर चौथ्या ते आठव्या क्रमांकांवर येणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० टक्के आणि इतर पात्र विद्यार्थ्यांना २० टक्के शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. 

विद्यार्थी २३ नोव्हेंबर रोजी नोंदणी करून, २५ नोव्हेंबर रोजी परीक्षा देऊ शकतात. सेफएज्युकेटच्या भारतभरातील केंद्रांमध्ये ही परीक्षा देता येईल. परीक्षेत सामान्य ज्ञान, इंग्रजी, अॅप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल स्टडीज या विषयांवरील प्रश्न असतील.

‘सेफएज्युकेट’द्वारा आखण्यात आलेला ‘अॅडव्हान्स डिप्लोमा इन लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे, ऑपरेशन मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट, सप्लाय चेन, कॉस्ट रिलेशन मॅनेजर, लॉजीस्टिक्स मॅनेजमेंट, सॉफ्ट स्किल या विषयांवर केंद्रीत आहे.

सेफएज्युकेटच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या जैन म्हणाल्या, ‘सेफएज्युकेट देशभरातील लोकांना प्रशिक्षित आणि सक्षम करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रात कारकीर्द करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना नोकरी मिळण्यासाठी मदतदेखील करू. अधिकाधिक भारतीय तरुणांना कौशल्य प्रदान करणे आणि या क्षेत्रात उच्चस्तरीय भूमिका निभावण्यासाठी त्यांना तयार करणे हा यामागील उद्देश आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search