Next
औंध येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, February 02, 2019 | 03:46 PM
15 0 0
Share this storyऔंध : येथील रयत शिक्षण संस्था संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि वाणिज्य विभागातर्फे एक दिवसीय राज्यस्तरीय विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली होती.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून औंध येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य व्यवस्थापक अलका रानवडे, पत व्यवस्थापक सागर दुबे, चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दराडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अलका रानवडे म्हणाल्या, ‘आपण विविध स्पर्धा परीक्षांची आणि बँकेच्या परीक्षांची तयारी करत असताना संपूर्ण अभ्यासक्रम माहित करून घेतला पाहिजे. आपल्याला जे पद मिळवायचे आहे, त्याचा सूक्ष्मपद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे.’

पोलीस उपनिरीक्षक दराडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येत असताना एखादे ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे; तसेच आपण ठरविलेले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशासकीय सेवेत आल्यानंतर आपल्याला विशेष अधिकार प्राप्त होतात. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा वापर  देशहितासाठी आणि समाजहितासाठी करता येतो. त्यामुळे आपण निश्चित ध्येय ठेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी केली, तर आपणास कोणतीही गोष्ट अवघड नाही.’महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘तरुण मुले-मुली ही या देशाची संपत्ती आहेत. त्यामुळे अनेक तरुण  मुला-मुलींनी समाजहितासाठी प्रशासकीय सेवेत रुजू होणे आवश्यक आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न तरुणांच्या जीवावर पाहिले होते. त्यामुळे महाविद्यालयातील अनेक तरुण मुला-मुलींनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून प्रशासकीय सेवेत रुजू व्हावे, या उद्देशानेच ही एकदिवसीय कार्यशाळा घेतली आहे.’

दुबे यांनी आयबीपीएस परीक्षेची तयारी कशी करायची,  कोणती पुस्तके वापरायची, आणि अभ्यास कसा करायचा यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख विद्यार्थी कल्याण मंडळाच्या प्रमुख डॉ. शशी कराळे यांनी करून दिली. प्रा. आसावरी शेवाळे यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. सविता पाटील, डॉ. संजय नगरकर, प्रा. कुशल पाखले, प्रा. मयुर माळी, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link