Next
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी
BOI
Friday, August 02, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:


पुणे : औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 

यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा लोकजागर केला. तसेच ‘माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीय काह्यली...’ या लोकगीताच्या माध्यमातून अण्णा भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयातील अरुणा साबळे, रेणुका मीठे, चंद्रकांत सोनवणे, ऋषिकेश कानवडे, तेजस राजिवडे, कोमल जावीर, अविनाश पांडे, पूजा कांबळे, गणेश आडागळे, या विद्यार्थ्यांनी पथनाट्यात सहभाग घेतला होता. 

यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी’, असे आवाहन त्यांनी केले. या जयंतीदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात कौशल्यावर आधारित अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आयबीपीएस परीक्षा मार्गदर्शन, परफॉर्मिंग आर्ट, उद्योजकता विकास, पत्रकारिता, आर्थिक साक्षरता, मानसशास्त्रीय समुपदेशन, अँड्रॉइड ॲप्स, आपत्ती व्यवस्थापन, बागकाम, फॅशन डिझाइनिंग, वस्तुसंग्रहालय शास्त्र, स्टॉक मार्केटिंग, स्क्रिप्ट रायटिंग फोटोग्राफी, ज्वेलरी डिझायनिंग, पणती मेकिंग व इतर अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. 

विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर एखादे कौशल्य आत्मसात करावे, यासाठी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेनकुदळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगर यांनी केले, तर प्रा. बी. एस. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Manoj subhash kasar About 20 Days ago
Khup chan asech karykram karat raha
0
0

Select Language
Share Link
 
Search