Next
प्रजासत्ताक दिनी शाळेला संगणक भेट
BOI
Monday, January 29 | 12:55 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील बालगणेश बहुद्देशीय संस्थेतर्फे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट दिला.

आधुनिक युगात विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे आणि शिक्षकांना त्यांचे काम अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी शाळेला संगणकाची आवश्यकता होती. याची दखल घेऊन शाळेला संगणक देण्याचे आश्वासन संस्थेकडून देण्यात आले होते. त्याची पूर्ती प्रजासत्ताक दिनी करण्यात आली.

या वेळी तारापूर गावचे सरपंच समाधान शिंदे, संस्थेचे अध्यक्ष सुरज कुलकर्णी, सहकार शिरोमणीचे संचालक प्रदीप निर्मळ, तारापूर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व बालगणेश बहुद्देशीय संस्थेचे भक्कम आधारस्तंभ बाळासाहेब सपाटे, उपाध्यक्ष सुहास सवाळकर, सचिव अनिकेत बुरांडे, खजिनदार ओंकार बाबतीवाले, सहसचिव अमोल सवाळकर, मार्गदर्शक भगवान श्री. बुरांडे, अविनाश बुरांडे गुरूजी, सदस्य पुरुषोत्तम सर्जे, सुजित कोष्टी, संस्थेचे सर्व विश्वस्त, शाळेचे मुख्याध्यापक श्री. लटके, श्री. तोटेवाड, श्रीमती कापसे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balasaheb Bhosale About 24 Days ago
अशा लोकांची गरज आहे. छान बातमी आहे.
0
0

Select Language
Share Link